You are currently viewing मठ येथील खानोलकर हायस्कूल मध्ये जागतिक वन व चिमणी दिन साजरा…

मठ येथील खानोलकर हायस्कूल मध्ये जागतिक वन व चिमणी दिन साजरा…

मठ येथील खानोलकर हायस्कूल मध्ये जागतिक वन व चिमणी दिन साजरा…

वेंगुर्ले

राष्ट्रीय हरित सेना विभाग व सामाजिक वन विभाग वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने मठ येथील डॉ.रा.धों. खानोलकर हायस्कूल मध्ये जागतिक वन दिन व चिमणी दिन साजरा करण्यात आला. यावेळी मानवी जीवनात वने व चिमणी यांच्या असलेल्या महत्त्वाच्या स्थानाबाबत विद्यार्थ्यांना चित्रफित दाखवण्यात आली.

दरम्यान यावेळी आठवी ते नववीच्या मुलांसाठी घेण्यात आलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेत सिद्धी सावंत (प्रथम), रश्मी भगत (द्वितीय) हसरी होडावडेकर (तृतीय) तर सोहम गावडे व विठ्ठल गावडे (उत्तेजनार्थ) क्रमांक पटकाविले. या सर्वांना सामाजिक वनिकरण विभागाचे बापू डोईफोडे यांच्या हस्ते बक्षिस देऊन गौरविण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक एस.ए. जाधव, राष्ट्रीय हरित सेना विभागाच्या प्रमुख एस.बी. कांबळी, शिक्षक जी.एम. गोसावी, ए.पी. वाढोकर, एन.बी. नाईक, डी.पी. मोबारकर यांच्यासह कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा