You are currently viewing वैभववाडीत बुधवारी रक्तदान शिबिराचे आयोजन…

वैभववाडीत बुधवारी रक्तदान शिबिराचे आयोजन…

वैभववाडी

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कोकण प्रदेश अध्यक्ष, ग्रामपंचायत सडुरे शिराळे चे विद्यमान सदस्य,श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष तथा सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानचे जिल्हा संस्थापक सदस्य, वैभववाडी तालुका विकास मंच चे स्थानिक संपर्क प्रमुख युवा सामाजिक कार्यकर्ते मा. नवलराज विजयसिंह काळे यांच्या 28 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून 25 ऑगस्ट 2021 रोजी(09.30 ते 1.30 वाजे पर्यंत) सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग व ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, दिल्ली महाराष्ट्र राज्य कोकण प्रदेश, यांच्या संयुक्त विद्यमाने वैभववाडी तालुका अर्जुन रावराणे विद्यालय (अ.रा.विद्यालय) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी रक्तदान करण्यास उपस्थित रहावे.असे आवाहन आयोजक यांच्या कडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा