You are currently viewing श्रीरामा दयाघना”

श्रीरामा दयाघना”

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास म्हणजे सदस्य कवी गीतकार संगीतकार गायक अरुण गांगल यांची अप्रतिम भक्तिरचना

श्रीराम दयाघनां धावून या लवकर
निसर्ग सृष्टी मध्ये माजला हाहा:कार।।ध्रु।।

महामारीने प्रजा झाली भीत भयंकर
एकमेका जवळ जाणें बंद राखी अंतर
माणूस माणसाला टाळू पाहे ठेवी दूर।।1।।

सत्संग करितो राखून सुरक्षित अंतर
मुख कान नाक झाकायांचे संरक्षणार्थ
औषधं अपुरी जगतो नशीबावर।।2।।

मानविय वैद्यकीय अपुरे उपचार
सर्व झटती सदा जगण्यासाठी अपार
रामा रक्षावे मानव,पर्यावरण सुधार।।3।।

अयोध्या दर्शनां आता झाले मुक्त द्वार
झाले स्थापन विश्वातील अपूर्व मंदिर
घ्यावया गोजिरं दर्शन आम्ही आतुर।।4।।

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + 2 =