You are currently viewing इचलकरंजीत गाळेधारकांचे बेमुदत साखळी उपोषण मागे

इचलकरंजीत गाळेधारकांचे बेमुदत साखळी उपोषण मागे

इचलकरंजीत

इचलकरंजी नगरपरिषदेसमोर गाळेधारक समितीच्या वतीने अन्यायकारक भाडेवाढ व अनामत रक्कम वाढीच्या विरोधात सुरु करण्यात आलेले बेमुदत साखळी उपोषण आज मंगळवारी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय देण्याच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.यासाठी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून प्रयत्न केले.

इचलकरंजी नगरपरिषद प्रशासनाने गाळेधारकांकडून सक्तीची वसुली थांबवावी,नवीन भाडे वाढ अन्यायकारक असून फेरमूल्यांकन करून आकारणी करावी,सील केलेले गाळे उघडून द्यावेत यासह विविध मागण्यांसाठी इचलकरंजी नगरपरिषद गाळेधारक समितीच्या वतीने नगरपरिषदेच्या प्रांगणात बेमुदत साखळी उपोषण सुरू केले होते.यामध्ये
सर्व गाळेधारकांनी आपले व्यवसाय बंद ठेवून या उपोषणात सहभाग नोंदविला होता. या प्रश्ना संदर्भात मार्ग निघावा म्हणून इचलकरंजी नगरपरिषद गाळेधारक समितीने आपल्या विविध मागण्या राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांच्याकडे मांडल्या होत्या.यामध्ये १ जानेवारी २०१८ पासून लागू केलेले भाडे हे अन्यायकारक असून ते रद्द करून फेर मूल्यांकन करुन नवीन भाडे १ एप्रिल २०२२ पासून आकारावे, सध्या चालू असलेली सक्तीची वसुली ताबडतोब थांबवावी ,सिल केलेले गाळे उघडून देऊन व्यापार करण्यास परवानगी द्यावी अशा विविध मागण्या घेवून मदन कारंडे यांनी ग्रामविकास तथा कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे विषय मांडण्यात आला.यावर त्यांनी गाळेधारकांच्या
प्रलंबित मागण्यांबाबत लवकरच बैठक लावून सकारात्मक निर्णय घेवू ,असे आश्वासन दिले.तसेच सदरचे बेमुदत
साखळी उपोषण मागे घ्यावे ,असे गाळेधारकांना आवाहन केल्याचे मदन कारंडे यांनी सांगितले.गाळेधारकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत तोडगा निघावा यासाठी वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे , माजी आमदार राजीव आवळे, माजी बांधकाम सभापती उदयसिंग पाटील, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, प्रकाश मोरबाळे माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते, अब्राहम आवळे यांचेही सहकार्य लाभल्याचे मदन कारंडे यांनी सांगितले.नगरविकास राज्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मदन कारंडे ,रवी रजपुते यांच्या हस्ते सरबत घेवून गाळेधारकांनी बेमुदत साखळी उपोषण मागे घेतले.
यावेळी गाळेधारक समितीचे पदाधिकारी , सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + 7 =