You are currently viewing कन्या महाविद्यालयात सुशिलादेवी साळुंखे यांचा स्मृतीदिन साजरा

कन्या महाविद्यालयात सुशिलादेवी साळुंखे यांचा स्मृतीदिन साजरा

इचलकरंजी : प्रतिनिधी

 

येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयामध्ये संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक संकल्पक शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या सुविद्य पत्नी आणि संस्थेचा आधारस्तंभ असणाऱ्या संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या दहावा स्मृतिदिन त्यानिमित्ताने महाविद्यालयामध्ये त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. त्रिशला कदम यांनी संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करताना त्यांच्या अनेक आठवणी सांगितल्या.

डॉ.बापूजी साळुंखे यांनी सुरू केलेल्या ज्ञानयज्ञामध्ये आपलं आयुष्य समर्पित करणाऱ्या एक धुरंदर,शांत, संयमी आणि तितक्याच सहनशील असणाऱ्या संस्थामाता या बापूजींसह श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या खूप मोठा आधार होत्या. बापूजींच्या सोबत आणि बापूजींच्या पश्चात त्यांनी सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांना सांभाळले ,असे भावपूर्ण उद्गार काढले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे कनिष्ठ विभाग प्रमुख अनिल कुंभार,कॅप्टन प्रमिला सुर्वे, डॉ.संतोष बोराटे, सोमनाथ गायकवाड, अनिल सुतार यांच्यासह गुरुदेव कार्यकर्ते , प्रशासकीय सेवक , शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा