You are currently viewing आपत्कालीन वापरासाठी किल्ले सिंधुदुर्ग व खोत जुवा बेट येथील ग्रामस्थांना दोन बोट उपलब्ध

आपत्कालीन वापरासाठी किल्ले सिंधुदुर्ग व खोत जुवा बेट येथील ग्रामस्थांना दोन बोट उपलब्ध

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग कडून उपलब्ध बोट आ. वैभव नाईक व तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते संबंधित यंत्रणेस सुपूर्द

मालवण :

किल्ले सिंधुदुर्ग व कालावल खाडी पात्रातील खोत जुवा बेट येथील ग्रामस्थांना पावसाळा कालावधीत समुद्र व खाडी धोकाच्या पातळीवर असतो त्यावेळी बाहेर येणाचे मार्ग बंद असतात. अश्या आपत्कालीन स्थितीत अथवा वादळ स्थितीत येथील ग्रामस्थांना बचाव सोय उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग कडून एक छोटी व एक मोठी अश्या दोन बोट उपल्बध करून देण्यात आल्या आहेत.

आ. वैभव नाईक व मालवण तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते दोन्ही बोट शनिवारी मालवण बंदर जेटी येथे आणून स्थानिक संबंधित यंत्रणेकडे देण्यात आल्या.

आपतकालीन स्थितीत अथवा अत्यावश्यक परिस्थितीत या बोटी येथील ग्रामस्थ रहिवाशी यांच्यासाठी निश्चितच महत्वाची सेवा बजावतील, असे आ. वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − five =