You are currently viewing सावंतवाडीत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

सावंतवाडीत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

सावंतवाडी :

 

कै.श्रीम लक्ष्मीबाई मुरारी माधव विदयालय आदर्श पुरस्कारप्राप्त जि. प. शाळा भटवाडी सावंतवाडी नं. ६ या शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न झाला. शाळेमध्ये पाठ्यपुस्तकांचे वितरण व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत माजी नगरसेविका सौ.दिपाली भालेकर यांच्या प्रमुख उपस्तिथीत झाले.

शाळेच्या पहिल्या दिवशी प्रथम सर्व मुलांची प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर इ. १ ली ला दाखल झालेल्या विदयार्थ्यांचे औक्षण माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी केले. मुख्याध्यापिका श्रीम. सायली लांबर व गीता सुतार यांनी सर्वांचे पुष्प देऊन स्वागत केले. सौ. दिपाली भालेकर, दिलीप भालेकर,अनिशा राणे, सौ. प्राप्ती राणे, श्रीम.ईश्वरी तेजम यांनी नवागत मुलांना गुलाबपुष्प व फुगे देऊन स्वागत केले.

त्यानंतर सर्व मुलांना समग्र शिक्षा अंतर्गत प्राप्त मोफत पाठयपुस्तकांचे वितरण माजी नगरसेविका दिपाली भालेकर उच्च शिक्षण तज्ञ दिलीप भालेकर, अध्यक्षा अनिशा राणे यांच्या हस्ते करण्यात आले. सावंतवाडी गटसाधन केंद्राचे विषयतज्ञ श्री. महेंद्र चव्हाण यांनी शाळेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

उच्च शिक्षण तज्ज्ञ दिलीप भालेकर व माजी नगरसेविका सौ. दिपाली भालेकर यांनी पुढील शैक्षणिक कार्यासाठी शिक्षक व विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सर्वांना खाऊ देण्यात आला. बालवाडी ताई सौ. गावडे मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री. मुद्राळे, सौ. खोचरे, सौ. डंकी, श्री. भिसे, सौ. साळुंखे उपस्थित होते. त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत शाळा पूर्व तयारी मेळावा क्रमांक २ चे आयोजन करण्यात आले सर्व मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मेळावा यशस्वी केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा