You are currently viewing शाळेतल्या बाकांवरची मैत्री बहरली तब्बल ३० वर्षांनी

शाळेतल्या बाकांवरची मैत्री बहरली तब्बल ३० वर्षांनी

मळगाव इंग्लिश स्कूल एसएससी बॅच १९९२ – ९३ चा स्नेहमेळावा अविस्मरणीय

सावंतवाडी

मळगाव इंग्लिश स्कूल, मळगावमधील दहावी बॅच १९९२-९३ च्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मळगाव रेडकरवाडी येथील ‘नरेंद्र सृष्टी ‘ च्या अत्यंत रमणीय व निसर्गरम्य असलेल्या परिसरात संपन्न झालेल्या या मेळाव्यात उपस्थित माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी सादर केलेले विविध गुणदर्शन कार्यक्रम मनोगते यांमुळे स्नेह मेळाव्याला बहार आली. धमाल मस्ती व मनोरंजनाच्या कार्यक्रमांसह जुन्या आठवणींना उजाळा देत हा स्नेह मेळावा अविस्मरणीय ठरला.

ह्या मेळाव्याचे आयोजन १७ एप्रिल पासून करण्याचा पाया गणेश गाड व्हॉटस् अपद्वारे करण्यांत आला होता. तद्नंतर एक एक करत ७५ माजी विद्यार्थी ह्या गटात सामील झाले. १७ एप्रिल पासून २१ एप्रिल पर्यंत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गटातील सर्व मंडळी झटत होती. कोणी जागेचे नियोजन, कोणी मंडप, कोणी चहा- नाश्ता, जेवणाचे नियोजन अरुण भाईडककर, दयानंद परब, बाप्पा नाटेकर, देवानंद नार्वेकर, सतीश राऊळ, शकुंतला राऊळ, महेश राऊळ यांनी तर सर्वासाठी शाळेचे नाव प्रिंट करुन टी शर्ट आणली.

या मेळाव्यात ग्रुपमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतांमधून आपली ओळख करून देतानाच वर्गातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच सद्यस्थितीत सर्वजण कोणकोणत्या क्षेत्रात कार्यरत आहेत याचाही आढावा घेतला. सर्वांनीच आपलं वाढतं वय विसरून सहकारी मित्रांसोबत धमाल केली. आपापल्या आयुष्यातील व करिअरमधील चढ-उतार यांचे अनुभव कथन करीत सर्वांचीच मने भाऊक अंतःकरणाने मोकळी झाली व पुढील आयुष्यासाठी नवी चेतना प्राप्त झाल्याचा भास झाला. दहावी नंतर आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी व्यवसायांनिमित्त एकमेकांपासून दूर गेलेले हे विद्यार्थी व विद्यार्थिनी तब्बल ३ दशकानंतर या स्नेह मेळाव्यात सर्व एकत्र आले होते, मैत्री सोहळा साजरा करण्यासाठी. मळगाव सहित सोनुर्ली, वेत्ये, निरवडे, न्हावेली, बावळाट या गावांमधील माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सहभाग असलेला हा स्नेहसोहळा उत्तम नियोजनात दिमाखात पार पडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − 5 =