You are currently viewing त्यात सामावते सारे…

त्यात सामावते सारे…

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित लेखिका कवयित्री प्रा. सौ.सुमती पवार यांची काव्यरचना

तिचा पदर आभाळ, त्यात सामावते सारे
घर दार नातलग,गाई गुरे नि वासरे
विश्व सामावते त्यात यात नवलाई काय
म्हणूनच देवासम साऱ्या जगताची माय….

तिचा हात अमृताचा,चिरंजीव तो करतो
प्रेम विश्वास नि, श्वास मना मनात भरतो
धागा रेशमाचा मऊ सारे ओवतच जातो
कधी संपतच नाही,प्रेमभावे आवळतो….

घरी दारी बरकत,पाऊलेच लक्षुमीची
तिच्या वरून ओळख,होते घराची दाराची
संस्कारांची खाण अशी नित्य घडविते पिढ्या
तिच्या हातात शोभती घरादाराच्या हो नाड्या..

माय नाही घरात ज्या तेथे ऊन हो तापते
संधी मिळताच पहा दु:ख्ख थयथय नाचते
होरपळ होरपळ घर सोलून निघते
माय असता घरात पदरात गुंडाळते…

माय माय माय माय असा तिचा हो महिमा
तिच्या पदराची सर, सर कशाला येईना
डोळे पुसाया पदर, दुध पाजाया पदर
ह्याच पदराने पहा कधी गाजवली सदर ..

डोईवरचा पदर मर्यादेची खुणगाठ
हा पदर मायेचा नाही दाखवत पाठ
सदा राहतो पाठीशी,आणि थोपटतो पाठ
असा पदर धरून,सारे चालतात वाट …

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + five =