You are currently viewing ऑफ तास

ऑफ तास

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी यांची अप्रतिम काव्यरचना*

*ऑफ तास* *( बाल कविता )*
————————–

आज झाली मज्या खास, मस्त केला टाइमपास
बाई होत्या रजेवर मग, मिळाला आम्हा ऑफतास
जल्लोष केला मुलांनी
अभ्यासाला बुट्टी
वह्या पुस्तके बंद
एका तासाची सुट्टी
साऱ्या तासांमध्येच असतो हाच तास खास
बाई होत्या रजेवर मग मिळाला आम्हा ऑफतास
गोष्टीं, गाणी, भेंड्या
खूप ऊत आला
मजे मजे ने तास
चट निघून गेला
मॉनिटर म्हणाला खूप झाले, आता करा बास
बाई होत्या रजेवर मग, मिळाला आम्हा ऑफतास
चिंचा, पेरू, कैऱ्या
हळूच बाहेर आल्या
रुमालाने तोडून
साऱ्यां हाती गेल्या
दर दिवशी सकाळी होतो याच तासाचा भास
बाई होत्या रजेवर मग, मिळाला आम्हा ऑफ तास

श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
9130861304
केवळ नावासहितच पुढे पाठवावे.
@ सर्व हक्क सुरक्षित
8.11.2022

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − 3 =