You are currently viewing रुग्णसेवा साहित्य केंद्राच्या माध्यमातून जनसेवेचा वसा जपा – डॉ. प्रविणकुमार ठाकरे

रुग्णसेवा साहित्य केंद्राच्या माध्यमातून जनसेवेचा वसा जपा – डॉ. प्रविणकुमार ठाकरे

तुळस येथे रुग्णसेवा साहित्य केंद्राचे लोकार्पण…

वेंगुर्ले

रुग्णसेवा साहित्य सेवा केंद्र ही जनसामान्यांची सेवा करण्याचे माध्यम आहे. मकरंद पाटणकर यांनी आईच्या स्मरणार्थ दातृत्व भावनेतून उपलब्ध करून दिलेल्या रुग्णसेवा साहित्य केंद्रामुळे वेताळ प्रतिष्ठानच्या आजवरच्या सामाजिक उपक्रमांच्या माळेत समाजकार्याचा अजून एक मणी गुंफला गेला. सेवा केंद्राच्या माध्यमातून जनसेवेचे व्रत अविरत चालू ठेवा, असे प्रतिपादन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, सावंतवाडीचे डॉ. प्रविणकुमार ठाकरे यांनी केले.

तुळस येथील वेताळ प्रतिष्ठान सिंधिदुर्ग संचलित कै. आशा पुरुषोत्तम पाटणकर स्मृती रुग्णपयोगी साहित्य सेवा केंद्र लोकार्पण कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमांचे अध्यक्ष दादासाहेब परुळकर, स्वागताध्यक्ष मकरंद पाटणकर,सरपंच शंकर घारे, माजी प.स.सभापती यशवंत परब,उपसरपंच सुशील परब, ग्रा. प. सदस्य जयवंत तुळसकर, शितल नाईक,सोनू आरमारकर, प्राथमिक आरोग्य केंद्र तुळस चे वैद्यकीय अधिकारी डॉ. डि. के. पवार, डॉ. संतोष कुडतरकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव प्रा.सचिन परुळकर,अरविंद गोरे,पूजा भणगे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + six =