You are currently viewing रंग पंचमी

रंग पंचमी

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारित ज्येष्ठ लेखक प्रो.डॉ.जी आर उर्फ प्रवीण जोशी यांचा अप्रतिम लेख

काय आहे रंगात ? अहो सर्व काही ! सृष्टी चा रंगच काही और !
क्षणाक्षणाला रंग बदलणारी सृष्टीची किमया ! पहाटे चा रंग किती तरल हवाहवासा , मनभावन सगळं कसं स्तब्ध निशांत ! आकाश सुद्धा निर्भर
निरभ्र , आपल्या तारांगण सहित . तोच झुंजूमंजु ची वेळ आली की
केशरी जांभळ्या छटात होणारा सूर्योदय .. .,
सकाळ पासुन ते रात्री पर्यंत वेगवेगळ्या रंगात न्हाणारी सृष्टी तर , रोजच रंग खेळत असते ना ! प्रत्येक ऋतुत तर तिचे बदलणारे दृश्य , वेगळेच वाटते ! अस वाटते की ती आपल्या जीवाचे चोचले पुरे करून घेण्यात पटाईत आहे ! प्रत्येक ऋतूतील तिचा नखरा हा डोहाळे पुरवून घेण्यात मग्न असते . तिचे रूप रंग , गंध , स्पर्श सुध्दा , मानवाला हवा हवासा वाटतोय . श्रावण तर काय विचारू नका . वर्षा ऋतूत चक्क गर्भार झालेली प्रेमिका षोडश वर्षीय , सौभाग्याने नटलेली सर्व अलंकार धारण केलेली , ही अवनी प्रत्येक ऋतुत नाविन्यपूर्ण रंग धारण करतेच की !
शीशीरातील काळांत झालेली ,
वसंतात नवीन कोवळी पालवी फुटणार रंग कोण विसरेल का ? ग्रीष्मात तर चक्क सोन केसरी चकाकणारी , सोनेरी रंगात दिसतेच , तिच्या झळा सुध्दा तीव्र वाटू लागतात.
दिवसाचा रात्रीचा रंग प्रत्येक ऋतूतील रंग , हीच तर खरी रंग पंचमी आहे ना ? फक्त दृष्टी हवी डोळ्यात नजाकत हवी तरच , तिचे रंग वैभव पाहता येतील . काही म्हणा
सृष्टीचा खरी सावली किंवा तिची प्रतिमा ही हुबेहूब “स्त्री ” मध्येच जाणवत नाही का ? विविध रंग छटांनी विविध पैलुनी तिची प्रतिकृती साक्षात मूर्तिमंत उदाहरण म्हणजे च
अवनी , स्त्री , व माती !!
चित्र विचित्र रंगाची झाडे , पाने, फुले , त्यांचे विविध रंग , त्यांचे आकार , उकार , त्यांचा विशिष्ट असा सुगंध , त्यांची उमळण्याची कला , विविध रंगाचे पक्षी, मोरपिसांची नजाकत , मृदू मुलायम स्पर्श , त्याचा निल जांभळा , सोनेरी रंग कोणत्या कारखान्यात तयार होतो ?, टाटा बिर्ला , अंबानी, यांच्या का ? पळसाची लाल केसरी , गुलमोहोर ची लाल , बाभळीची पिवळसर हळदी , गोकर्णा ची निळी , गुलाबाची विविध रंगातील , कमळ फुलातील नजाकत ता , चंद्र विकास , सुर्य विकासी फुले,
तसच फळा बाबत म्हणता येईलच !
विविध अवीट गोडीची फळे , त्याचा रंग वास , चव , ही सर्व रंगाची उधळण कोणाची ? निसर्ग ती अवनी ती पृथा , ती मेदिनी , ती माती , ती सृष्टी , तिचाच चमत्कार ना , तिचे रूप रंग चराचरात भिन्न आकारात साकार झालेली माता ! सृष्टीची रंग पंचमी ही सदैव चालुच असते . तिच्या सारखे नटणे , मुरडणे, लाजणे, हसणे , हट्ट करणे , विविध रंगाची त्या त्यावेळी पखरण करणे हे फक्त तिलाच जमुन जाते , तो रंग व अंतरंग , सुप्तरंगा सारखा च ! केव्हा इंद्रधनुष्य जागे होईल व सप्तरंग देईल , ते फक्त तीलच ज्ञात !
काहीवेळा असे वाटते की, ह्या नर देहाला मोक्ष मिळण्यासाठी ह्या सर्व रंगाची योजना सृष्टीने करून ठेवली असावी . तो ज्ञानी व्हावा व जीव उद्धरून जावा , त्याला मिळालेले आयुष्य हे आनंदी समाधान कारक व्हावे म्हणूनच ह्या रंगाचा खटाटोप झाला असावा ! यात शंका नाही .

बालपणापासून ते वयस्क होई पर्यंत तिच्या सर्व रंगाची किमया व किमयागार ! सप्तरंगात उधळण करत असतेच ना ? त्यात तो जीवंत पणा आहे तो , नकली रंगात आहे का ?
रंग ओळखता आले पाहिजेत , प्रत्येक वेळा आपल्या सोयीनुसार रंग बदलणारा चेहरा पण ! सर्व काही सांगुन जातोच . जीवनात बरेच रंग आहेत , त्या त्या वेळी तो तो रंग धारण करतोच ! काही आतल्या गाठीचे रंग तर कमाल करून जातात . हर घडी हर पल रूप है जिंदगी !
असे हे रंगायन रसायन सप्तरंगात उजळुन आपले आयुष्य चाललेलं असतच मग वरच्या रंगाच्या प्रेमात न पडता , तुमच्या अंतरंगतील रंग उधळा व परस्पर प्रेम करा म्हणजेच खरी रंगपंचमी साजरी केल्याचा , आंनद शत पटीने वाढतो

भुता परस्परे जडो मैत्र जीवाची ।।

आपला विनीत

प्रो डॉ जी आर प्रवीण जोशी

अंकली बेळगाव

कॉपी राईट धुळवड
18 मार्च 22

प्रतिक्रिया व्यक्त करा