You are currently viewing नवरात्रोत्सव संदर्भात राज्य सरकारनं जाहीर केली गाईडलाईन्स…

नवरात्रोत्सव संदर्भात राज्य सरकारनं जाहीर केली गाईडलाईन्स…

मुंबई

कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थिती लक्षात घेता यंदा नवरात्रौत्सव, दुर्गापूजा आणि दसरा सण कसा साजरा करावा, याबाबत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्य सरकारना मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहे.

सार्वजनिक नवरात्री उत्सव मूर्ती 4 फूटापेक्षा तर घरगुती 2 फूटापेक्षा मोठी नसावी, देवी मिरवणूक काढता येणार नाही, विसर्जन नियमावली पाळावी, मंडपस्थळी सॅनिटाझयरचा वापर करावा लागेल. दर्शन रांगेत सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळावा लागेल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे यंदा गरबा कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रमांच गर्दी न करता आयोजन करावे.

कोविड-19 संकट लक्षात घेता सोशल डिस्टंसिंगच्या नियमावलीचं पालन करावं, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या सरकारच्या मोहिम प्रचार जनतेच्या हितासाठी करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

दसऱ्याच्या दिवशी मात्र रावण दहन करता येणार आहे. मात्र, या कार्यक्रमाला गर्दी होणार नाही. सुरक्षित सामाजिक अंतर नियमावली पाळली जाणे गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनामुळे देशावर ओढवलेल्या संकटात अनलॉकचा चौथ्या टप्पा 30 सप्टेंबरला संपणार आहे. 1 ऑक्टोबरपासून अनलॉक-5 सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अनलॉक-5 अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सूट संदर्भात आज मार्गदर्शक सूचना जारी करण्याची शक्यता आहे.

यंदा शक्यतो पारंपरिक देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तीचं पूजन करावं. मूर्ती शाडूची, पर्यावरण पूरक असल्यास तिचं विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी शक्य नसल्यास कृत्रीम विसर्जन स्थळी करण्य संदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.

नवरात्रौत्सवासाठी वर्गणी, देणगी स्वेच्छेनं दिल्यास स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही, हे पाहावं.

– देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबव नेटवर्क, वेबसाईट, फेसबुक आदीद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी जास्तीत जास्त व्यवस्था करावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − fourteen =