You are currently viewing आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सुरु

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सुरु

वैभववाडी

सध्या महाराष्ट्र शासनाकडून जाहीर झालेली ७२०० पदांची पोलीस भरती, राज्य राखीव दलामध्ये होणारी भरती व अग्निपथ योजने अंतर्गत होणारी अग्नियोद्धा पदासाठीची मोठी भरती यांच्या अनुषंगाने आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना या भरतीची तयारी करता यावी म्हणून आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडी येथे मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र मोफत सुरू करण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारी लेखी परीक्षा व शारीरिक चाचणी या दोन्हीची तयारी करून घेतली जाणार आहे. लेखी परीक्षा शंभर मार्कची असते. या परीक्षेसाठी अंकगणित, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण व चालू घडामोडी या अभ्यासक्रमावरील प्रश्न विचारले जातात. या लेखी परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्याशी महाविद्यालयाचा सामंजस्य करार झालेला आहे. याद्वारे शंभर मार्गाच्या लेखी परीक्षेची तयारी ऑनलाईन पद्धतीने करून घेतली जाईल. एक जुलै पासून पुढे चार महिने दररोज ऑनलाईन पद्धतीने एक ते दीड तास वरील अभ्यासक्रमावरती तासिकांचे आयोजन केले जाईल. आठवड्यातून एकदा चाचणी परीक्षा घेतली जाईल. तसेच महाविद्यालयातील तज्ञ महाराष्ट्र मार्गदर्शकांच्या मार्फत दर शनिवारी तासिका घेतल्या जातील. अशाप्रकारे १०० मार्काच्या लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. तसेच शारीरिक चाचणी ५० मार्काची असते. यामध्ये मुलांसाठी १६०० मीटर रनिंग व मुलींसाठी ८०० मीटर रनिंग यासाठी २० मार्क असतात. १०० मीटर रनिंगसाठी १५ मार्क असतात. व गोळा फेकसाठी १५ मार्क असतात. या शारीरिक चाचणीची संपूर्ण तयारी महाविद्यालयाच्या प्रशस्त मैदानावर महाविद्यालयातील शारीरिक शिक्षकांच्यामार्फत करून घेतली जाणार आहे. दररोज दीड ते दोन तास शारीरिक चाचणीचे प्रशिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर दिले जाईल. शारीरिक चाचणीचे मूल्यमापन करण्यासाठी आठवड्यातून एकदा परीक्षा घेतली जाईल. यामध्ये धावण्यासाठी लागणारा वेळ व गोळा फेकची लांबी मोजली जाईल. अशाप्रकारे चार महिने शारीरिक चाचणीची संपूर्ण तयारी करून घेतली जाईल. वरील संपूर्ण प्रशिक्षण पूर्णपणे मोफत आहे तरी वैभववाडी तालुक्यातील सर्वांनी याचा लाभ घ्यावा. महाविद्यालयातील विद्यार्थ्यासह महाविद्यालया बाहेरील तयारी करणाऱ्या मुलांनाही यामध्ये मोफत सहभागी करून घेतले जाईल. हे प्रशिक्षण ०१ जुलै पासून सुरू होईल. वरील प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनींनी लाभ करून घ्यावा व स्वतःचे भवितव्य उज्वल करावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी महाविद्यालयीन समन्वयक डॉ. अजित दिघे (८०८७५५५४६५) यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × one =