You are currently viewing १० नोव्हेंबर रोजी कोलगावचे ग्रामदैवत श्री सातेरी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव.. 

१० नोव्हेंबर रोजी कोलगावचे ग्रामदैवत श्री सातेरी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव.. 

सावंतवाडी :

 

कोलगावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव गुरूवारी १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर सातेरीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांनी सजवीण्यात येणार आहे. यानिमित्त रात्री कुळ व थळ घराकडून सवाद्य तरंग काठीसह पालखी निघणार आहे.

या दिवशी देवीच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होणार आहे. रात्री ११ सवाद्य पालखी मिरवणुकीनंतर मध्यरात्री १ वाजता पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थान कमिटी अध्यक्ष चंदन धुरी आणि देवस्थानच्या सर्व मानकऱ्यानी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा