You are currently viewing रेडी येथे सागरी जीव रक्षकाकडून परदेशी पर्यटकाला जीवदान

रेडी येथे सागरी जीव रक्षकाकडून परदेशी पर्यटकाला जीवदान

वेंगुर्ला :

 

रेडी यशवंतगड नजीक असणाऱ्या बिचवर नेहमी देशी-विदेशी पर्यटक पोहण्यास येत असतात. रविवारी दुपारच्या सुमारास एक पर्यटक शगुन ब्रहमला (वय २५ वर्ष) रा. दुबई बुर्ज अल हा पर्यटक गोवा हरमल येथे पर्यटनासाठी आला होता. शिरोडा वेळागर बिच वरून रेडी यशवंतगड बिच वर येण्यासाठी त्याने खाडी ओलांडण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे शगुन त्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊन किनाऱ्यापासून आत पाण्यात ओढला जाऊ लागला. प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो वाहून जात असताना त्यावेळी घटनास्थळी असणारे सागरी जीव रक्षक संजय गोसावी यांनी लाईफ जॅकेटच्या सहाय्याने पोहत जाऊन त्या पर्यटकाला वाचवले.

पर्यटकाने आपले जीव वाचविल्याबद्दल सागरी जीव रक्षक संजय गोसावी आणि ग्रामपंचायत जीव रक्षक यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा