You are currently viewing कुडाळात सेनेचे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडे लावा आंदोलन…!

कुडाळात सेनेचे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडे लावा आंदोलन…!

कुडाळ

कुडाळ नगरपंचायतीच्या हद्दीतील आंबेडकर नगर ते एसटी डेपो पर्यंत रस्त्यावर पडलेले खड्डे वेळीच न बुजविल्याने आज शिवसेनेच्या वतीने रस्त्यावर झाडे लावणे आंदोलन छेडण्यात आले. अखेर नगरपंचायतीचे मुख्यकार्यकारी अधिकारी गाढवे यांनी दिलेल्या आश्वासनामुळे आंदोलक शांत झाले. शिवसेना नेते संजय भोगटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. शहरातील मुख्य रस्त्यांसह इतर रस्त्यांची दुरावस्था झाल्याने शिवसेनेला आंदोलन करावे लागले. यामध्ये सत्ताधारी व प्रशासन यांनी शहराकडे विकासाच्या दृष्टीने काही प्रयत्न केले गेले नाहीत. शहर विकासाला शिवसेनेच्या माध्यमातून करोडो रुपये आले. परंतु शहर विकसित करण्यात चालढकल केली जात असल्याचा आरोप यावेळी भोगटे यांनी केला.आज आंदोलकांनी नगरपंचायतीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांशी बोलताना गाढवे यांनी १५ ऑक्टोबरपर्यंत या रस्त्याचे काम सुरु होईल, असे आश्वासन दिले. नगरपंचायतीच्यांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे निर्माण झाले ते दुरुस्ती लवकर करु, असेच आश्वासन दिले. यावेळी तालुका प्रमुख राजन नाईक, संतोष शिरसाट, नगरसेवक जीवन बांदेकर, बाळा वेंगुर्लेकर, सचिन काळप, गणेश भोगटे, संजय बोभाटे, किरण शिंदे, बाळा पावसकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 11 =