You are currently viewing सार्वत्रिक निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार

सार्वत्रिक निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार

*पक्षनिष्ठा ठेवा; प्रामाणिकपणे काम करा..*

*जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे*

सावंतवाडी :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सार्वत्रिक निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढविणार, पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटना सक्षम होण्यासाठी प्रामाणिकपणे काम करायला हवं, सकारात्मक दृष्टीकोन ठेवा, असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी केले.

सावंतवाडी तालुका काँग्रेस ची बैठक रविवारी कोलगाव- निरुखे वाडी येथील बबन डीसोझा यांच्या इन हाऊस रेस्टॉरंट येथे पार पडली. यावेळी काँगेस चे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ. साक्षी वंजारी, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, शहर अध्यक्ष अॅड. दिलिप नार्वेकर, तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी, प्रा. अन्वर खान,बुगडे, विल्यम सालढाना, अॅड. संभाजीराव सावंत आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 5 =