You are currently viewing वेंगुर्ला, शिरोडा, रेडी, निवती भागात तोक्ते चक्रीवादळा मुळे झालेल्या नुकसानीवर स्थानिक आमदारांची पूर्णपणे पाठ..

वेंगुर्ला, शिरोडा, रेडी, निवती भागात तोक्ते चक्रीवादळा मुळे झालेल्या नुकसानीवर स्थानिक आमदारांची पूर्णपणे पाठ..

स्थानिक आमदारांनीच केली पाठ मग मुखमंत्री तरी कसे काय येणार या भागात ; मनसे तालुका सचिव राजाराम (आबा) चिपकर

तालुक्यातील काही भागातील विद्युत प्रवाह अजुनही खंडीत..

वेंगुर्ले

वेंगुर्ला, शिरोडा, निवती या भागात तोक्ते चक्रिवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मोठ मोठी झाडे पडून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले परंतू येथिल स्थानिक आमदार या ठिकाणी पाठ फिरवत आहे.
तोक्ते चक्रिवादळा मुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी स्वतः मा. मुख्यमंत्री साहेब सिंधुदुर्गात आले परंतु त्याचा वेंगुर्ला निवती येथे दौरा हा नियोजित कार्यक्रम असुन सुद्धा ते तेथे गेले नाहीत. मुख्यमंत्री येणार म्हणून तेथील कोळी बांधवांनी नियोजन केले होते. परंतु मुख्यमंत्री तेथे न गेल्यामुळे तेथिल ग्रामस्थां मधुन नाराजी व्यक्त केली जात आहे.
तसेच तालुक्यातील काही भागातील विद्युत प्रवाह अजून देखील खंडीत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचे आणि विरोधी पक्ष नेत्यांचे दौऱ्यांचे नक्की फलित काय ? असा प्रश्न मनसे तालुका सचिव राजाराम (आबा) चिपकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
वेंगुर्ला, शिरोडा, निवती या भागात तेथित स्थानिक आमदारांनीच पाठ फिरवली आहे त्या मुळे तेथे मुख्यमंत्री तिरी कसे काय येणार असे वक्तव्य मनसे तालुका सचिव राजाराम (आबा) चिपकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 14 =