You are currently viewing अर्णव गोस्वामी यांच्यावरील कारवाई सुडबुद्धीने : राज्य शासनाचा जाहीर निषेध…

अर्णव गोस्वामी यांच्यावरील कारवाई सुडबुद्धीने : राज्य शासनाचा जाहीर निषेध…

वैभववाडी भाजपाचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन

वैभववाडी
पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा आम्ही जाहीर निषेध करतो. भाजपा पूर्णपणे गोस्वामी यांच्या पाठीशी आहे. सरकारकडून गोस्वामीवर होत असलेला अन्याय त्वरीत थांबवावा अन्यथा तालुक्यात तीव्र निषेध आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा वैभववाडी भाजपच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना देण्यात आले आहे.
पत्रकार, नागरिक यांच्याशी सरकार सूडबुद्धीने वागत आहे. याचा प्रत्यय संपूर्ण राज्याला आहे. नाईक यांची हत्या वैयक्तिक समस्येतून झाली आहे. मात्र पत्रकार यांना यात गुंतविले जात आहे. ही घटना भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी आहे. असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी तालुका अध्यक्ष नासीर काझी, जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र साठे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, रामदास पावसकर, शेळके, गोविंद घाडी, अनंत फोंडके आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 15 =