You are currently viewing अविनाश पराडकर यांची लोकसभा सोशल मीडिया अध्यक्षपदी निवड

अविनाश पराडकर यांची लोकसभा सोशल मीडिया अध्यक्षपदी निवड

महाराष्ट्र प्रभारी आशिष शेलार यांनी केली घोषणा

भारतीय जनता पक्षाने संपूर्ण देशभरात लोकसभेची निवडणूक जिंकण्यासाठी मजबूत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पक्षाच्या केंद्रीय यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात “मिशन १४४” राबवले जात आहे. लोकसभा प्रवास योजना अभियानांतर्गत ओरोस येथे भाजपा नेते तथा महाराष्ट्र प्रभारी असलेल्या आमदार आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आज ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आ.आशिष शेलार यांनी अविनाश पराडकर यांची लोकसभेच्या मुख्य संयोजकपदी नियुक्ती घोषित केली.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा प्रवास योजना अभियान यशस्वीपणे राबवण्याच्या दृष्टीने दोन्ही जिल्ह्यातील एकूण सहा विधानसभेत सोशल मीडियाची प्रभावी यंत्रणा राबवण्याची जबाबदारी अविनाश पराडकर यांच्यावर सोपवली आहे. यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष म्हणून पराडकर यांची कामगिरी अतिशय प्रभावी राहीली असून भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्यपदी त्यांची निवड करण्यात आली होती. लोकसभेची ही विशेष जबाबदारी अविनाश पराडकर यशस्वीपणे पेलतील असा विश्वास पक्षवर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी आमदार आशिष शेलार यांच्यासह जिल्हाध्यक्ष राजन तेली, आमदार नितेश राणे, महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रमोद जठार, लोकसभा संयोजक अतुल काळसेकर, रणजित देसाई, महिला जिल्हाध्यक्षा सौ संध्या तेरसे, प्रभाकर सावंत, भाई सावंत आदी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + fifteen =