You are currently viewing मैद्याचा ट्रक भुईबावडा घाटात पलटी

मैद्याचा ट्रक भुईबावडा घाटात पलटी

वैभववाडी

मैद्याची पोती घेऊन जाणारा ट्रक भुईबावडा घाटात पलटी झाला आहे. या अपघातामुळे घाट मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. हा अपघात दुपारी 12 वा. च्या दरम्यान झाला आहे. टायर फुटून हा अपघात झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पो. ना. आर.व्ही. नारणवर, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड, श्री. जायभाय हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातात चालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले आहेत.

मैद्याने भरलेला ट्रक ( नं.एमएच15-ईजी- 7839) सिन्नरहून गोव्याकडे चालक सचिन दशरथ शिरसाट घेऊन जात होते. त्यांच्यासोबत क्लिनर विकास अशोक रंगचोरे होते. भुईबावाडा घाटात ट्रक आला असता ट्रकचा पुढील डाव्या बाजूचा टायर अचानक फुटला. आणि ट्रक रस्त्यातच पलटी झाला. या अपघातात मैद्याच्या पिशव्या खोल दरीत गेल्या आहेत. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ट्रकचे ही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पोलीस घटनास्थळ दाखल झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 2 =