बांदा केंद्रशाळेतआॉनलाईन शुभेच्छांनी कले नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत..

बांदा केंद्रशाळेतआॉनलाईन शुभेच्छांनी कले नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत..

बांदा

दरवर्षी उन्हाळी सुट्टीनंतर चैतन्यमय वातावरणात १५जूनला मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात येते ,पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी हा दिवस प्रत्यक्ष शाळेत येऊ साजरा करता येणे अशक्य झाल्याने बांदा नं.१ केंद्रशाळेत या दिवशी नवीन शैक्षणिक सन २०२१-२२या वर्षाच्या ऑनलाईन शुभेच्छा विद्यार्थ्यांना देण्यात आल्या.
जिल्ह्यातील सर्वाधिक पटसंख्या व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी शाळा म्हणून ख्याती असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील बांदा नं.१केंद्र शाळेत या दिवशी विद्यार्थ्यांना विविध मान्यवरांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्याने पहिल्या दिवशी शैक्षणिक वातावरण निर्मिती होऊन विद्यार्थ्यांनाही मान्यवरांच्या या शुभेच्छा प्रेरणादायी ठरल्या.
गेले वर्षभर बांदा शाळेच्या वतीने आॉनलाईन विविध स्पर्धात्मक उपक्रम राबविण्यात आले होते तसेच सातवीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शुभेच्छा देणारी राज्यातील पहिलीच शाळा ठरली होती.
शैक्षणिक वर्षाच्या या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच अक्रम खान, शिक्षण विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर जेष्ठ नागरिक अक्रम खान सर,मुख्याध्यापक सरोज नाईक, शिक्षिका वंदना शितोळे, प्राजक्ता पाटील ,विद्यार्थीनी सानिका नाईक यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन स्वागत केले व विद्यार्थ्यांनी शाळा चालू होईपर्यंत आॉनलाईन अभ्याबरोबर आपल्या आरोग्याची काळजी घेऊन शैक्षणिक प्रगती साधावी असे आवाहन केले.
या ऑनलाईन शुभेच्छा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक श्री जे. डी. पाटील यांनी केले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी शिक्षक रंगनाथ परब, उर्मिला मौर्ये, रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत ,जागृती धुरी व पालक यांनी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा