You are currently viewing कासार्डे आनंदनगरमध्ये महिला दिन विविध उपक्रमांने उत्साहात साजरा

कासार्डे आनंदनगरमध्ये महिला दिन विविध उपक्रमांने उत्साहात साजरा

तळेरे: प्रतिनिधी

कासार्डे आनंदनगरमधील महिलांनी एकत्र येऊन ८मार्च रोजी जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.
यानिमित्ताने वाडीतील सर्व महिलांनी एकत्र येऊन संगीत खुर्ची,व इतर मनोरंजक खेळ खेळत यंदाचा जागतिक महिला दिन आनंदी वातावरण साजरा केला आहे.
याप्रंसगी सौ.महाडिक व सौ. मुद्राळे यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व विशद केले व महिलांना शुभेच्छा दिल्या.
या दिनाचे औचित्य साधून लहान मुलांची संगीत खुर्ची स्पर्धाही संपन्न झाली.
या छोट्या खानी आयोजित कार्यक्रमाला महिला व बाल गोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते..

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 4 =