You are currently viewing कॅथॉलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखेचा उद्या स्थलांतरण सोहळा..

कॅथॉलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखेचा उद्या स्थलांतरण सोहळा..

कॅथॉलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखेचा स्थलांतरण सोहळा उद्या 7 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. दाभोली नाका येथील पाटील चेंबर्स मध्ये स्वमालकीच्या जागेत ही शाखा स्थलांतरित करण्यात आली असून त्याचे उद्घाटन सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी या संस्थेच्या सर्व सभासद ग्राहक व हितचिंतकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष पी. एफ. डाॅन्टस यांनी केले आहे.

कॅथॉलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सावंतवाडी ही संस्था गेली अनेक वर्षे ग्राहकांच्या सेवेसाठी कार्यरत आहे. या पतसंस्थेच्या माध्यमातून ग्राहकांना कर्जपुरवठ्यासह विविध योजनांचा लाभ दिला जात आहे. कॅथॉलिक समाजासह सर्व धर्मियांना ही संस्था सहकार्य करत आहे.

वेंगुर्ला येथे कार्यरत असलेली शाखा आता दाभोली नाका येथील पाटील चेंबर्स इमारतीत स्वमालकीच्या जागेत स्थलांतरित करण्यात आली आहे. त्याचा उद्घाटन सोहळा उद्या आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन पी. एफ. डाॅन्टस यांच्यासह उपाध्यक्ष फ्रान्सिस डिसोजा, सेक्रेटरी मार्टिन अल्मेडा तसेच सर्व संचालक मंडळ व सेवक वर्गाकडून करण्यात आले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × four =