You are currently viewing भोसले स्कूलमध्ये रंगला बालदिन; शिक्षकांच्या कलाविष्कारासह विविध उपक्रम उत्साहात संपन्न

भोसले स्कूलमध्ये रंगला बालदिन; शिक्षकांच्या कलाविष्कारासह विविध उपक्रम उत्साहात संपन्न

भोसले स्कूलमध्ये रंगला बालदिन; शिक्षकांच्या कलाविष्कारासह विविध उपक्रम उत्साहात संपन्न

सावंतवाडी

यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना पंडित नेहरुंच्या जीवनकार्याची माहिती देण्यात आली. सोबतच बालदिनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. शाळेच्या प्राथमिक विभागातील शिक्षिकांनी विद्यार्थ्यांसाठी नृत्य तर माध्यमिक विभागातील शिक्षकांनी समूहगान सादर केले. यावेळी विविध खाद्यपदार्थांच्या व खेळांच्या स्टॉल्सचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. दुपारच्या सत्रात रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.

विविध सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ आणि स्पर्धांमुळे संपूर्ण दिवस आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सूत्रसंचालन ऋतुजा तुळसकर तर आभार प्रदर्शन दीपिका कदम यांनी केले. कार्यक्रमाला शाळेच्या अध्यक्षा ऍड. डॉ. अस्मिता सावंतभोसले, मुख्याध्यापिका प्रियंका देसाई, उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक तसेच सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा