You are currently viewing विद्यार्थ्यांना मार्गदर्शन..

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन..

शिक्षण म्हणजे काय?

 

*मानवी जीवनात ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. ज्ञानाइतके पवित्र,मंगल व उपयुक्त अन्य काहीही नाही.हे ज्ञान संपादन करण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो त्याला शिक्षण असे म्हणतात.*

आईच्या कुशीतून शिक्षणाला जी सुरुवात होते ती थेट सरणावर संपेपर्यंत,याचाच अर्थ असा की,जन्मापासून मरेपर्यंत शिकत राहिले पाहिजे.
*म्हणूनच जीवनविद्या सांगते – ‘शिक-क्षण’,’क्षणाक्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण”*
ज्ञान नसेल किंवा शिक्षण नसेल तर माणूस म्हणजे दोन पायांचा पशू होय.माणसातील दोन पायांच्या पशुंची संख्या दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणावर वाढत आहे.पैसा हाच परमेश्वर झाल्यामुळे माणसे या पैशाच्या पाठीमागे पिसाटासारखी धावत आहेत व ज्या ज्ञानातून शहाणपण निर्माण होते त्या ज्ञानाकडे पाठ फिरवून आहेत.जगामध्ये सुख कणभर आहे तर दुःख मणभर,याचे प्रमुख कारण लोकांनी पैशाला वाजवीपेक्षा जास्त महत्व देऊन ज्ञानाकडे पाठ फिरविली हे होय. *थोडक्यात,जीवनात ज्ञानाला पर्याय नाही आणि म्हणूनच जीवनविद्या सांगते,*

*ज्ञान हे शस्त्र,अस्त्र व शास्त्र आहे,*
*ज्ञान हे शक्ति,बल व सामर्थ्य आहे,*
*ज्ञान हे धन,संपत्ती व ऐश्वर्य आहे,*
*ज्ञान हा देव,ईश्वर व परमेश्वर आहे,*
*म्हणून ज्ञानी व्हा व धन्य व्हा.*

🙏~सद्गुरु श्री वामनराव पै.🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा