You are currently viewing खरा धर्म मानव धर्म

खरा धर्म मानव धर्म

धर्म या संकल्पनेत महाराष्ट्राला स्थान काय ?

*उत्तर* :-  *क्रमशः…*

या सर्व अनिष्ट गोष्टी घडण्याचे एकमेव कारण म्हणजे निर्माण झालेले भयंकर विचार प्रदूषण हे होय. इतर सर्व प्रदूषणे म्हणजे अन्नाचे प्रदूषण, पाण्याचे प्रदूषण, हवेचे प्रदूषण, हवेचे प्रदूषण, आवाजाचे प्रदूषण ही सर्व प्रदूषणे अनिष्टच आहे यात संशय नाही परंतु विचार प्रदूषण हे सर्वात महाभयंकर अरिष्ट आहे. या राष्ट्रातील लोकांना वरील सत्याची जाणीव झालेली नाही ही मोठी खेदाची गोष्ट आहे. वास्तविक राष्ट्रातील सर्व लोकांचे ऐक्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेथे ऐक्य असते तेथे लक्ष्मी, संपत्ती, शांती, समृद्धी, सुख व समाधान नांदते. हातांची पाच बोटे जर ताठ केली तर त्या बोटांकडून कागद उचलण्याचे शिल्लक काम सुद्धा होणार नाही. याच्या उलट पाच बोटे जर एकत्र आली तर ती बोटे कुठलेही काम करण्यास समर्थ ठरतील त्याप्रमाणे या राष्ट्रातील माणसे धर्माचा, जातीच्या, वंशाच्या, भाषेच्या किंवा सत्तास्पर्धेच्या नावाखाली अहंकाराने, अभिमानाने ही किंवा दुराग्रहाने ताठ होऊन आपापसात झगडत राहतील तर या राष्ट्राची प्रगती होणे कठीणच आहे.

*– सद्गुरूश्री वामनराव पै.*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + fourteen =