You are currently viewing ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास मुदतवाढ

ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास मुदतवाढ

ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इ. 5 वी व  8 वी  साठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज  दिनांक 01 फेब्रुवारी 2022  ते 28 फेब्रुवारी 2022 (रात्री 11.59 वाजेपर्यंत) कालावधी निश्चित करण्यात आला होता. सदर कालावधी संपुष्टात आला आहे.

                उपरोक्त ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्यास मुदतवाढ देण्यात येत असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे

                नावनोदंणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्यासाठीचा दिनांक – मंगळवार, दिनांक 01 मार्च 2022 ते गुरुवार, दिनांक 31 मार्च 2022 (रात्री 11.59 वाजेपर्यंत) विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी अर्ज भरणे. बुधवार, दिनांक 02 मार्च 2022 ते सोमवार, दिनांक 04 एप्रिल 2022 पर्यंत- विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहीत शुल्क व मुळ कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करणे. गुरुवार, दिनांक 07 एप्रिल 2022 संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहीत शुल्क, मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करणे.

                  वरील कालावधीमध्ये मुक्त विद्यालय मंडळाच्या इ. 5 वी व 8 वी. साठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुढील संकेतस्थळाचा वापर करावा. http://msbos.ms-ssc.ac.in. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी असे डॉ. अशोक भोसले सचिव, महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे यांनी कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा