You are currently viewing तू माझा सांगाती ललित संग्रहाचे रविवारी प्रकाशन

तू माझा सांगाती ललित संग्रहाचे रविवारी प्रकाशन

इचलकरंजी / प्रतिनिधी

येथील श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. प्रतिभा पैलवान यांनी श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर या पायी वारी सोहळ्यामध्ये आलेल्या अनुभवांवर आधारित लिहिलेल्या “तू माझा सांगाती” या ललित संग्रहाचे प्रकाशन श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये रविवार दिनांक 5 मार्च रोजी सकाळी ठिक 11 वाजता
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत
होणार आहे. या प्रकाशन सोहळ्यासाठी आमदार प्रशांतराव परिचारक , प्रांताधिकारी
गजानन गुरव , ह.भ.प. देवव्रत राणा वासकर महाराज, ह.भ.प. ज्ञानेश्वर जळगांवकर महाराज, श्रीमती शकुंतला नाडगिरे, कन्या महाविद्यालयाच्या प्राचार्या
डॉ. त्रिशला कदम यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.तरी या पुस्तक सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहून वैचारिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन साहित्यिका प्रा.डाॅ.प्रतिभा पैलवान यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा