You are currently viewing ठाकरे गट शिवसेना कणकवली शहराच्यावतीने आम.वैभव नाईक यांच्या दीर्घायुष्यासाठी स्वयंभू मंदिरात महारुद्र

ठाकरे गट शिवसेना कणकवली शहराच्यावतीने आम.वैभव नाईक यांच्या दीर्घायुष्यासाठी स्वयंभू मंदिरात महारुद्र

कणकवली

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आम. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी ठाकरे गट शिवसेना कणकवली शहराच्यावतीने कणकवलीचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू मंदिरात आम.वैभव नाईक व पत्नी स्नेहा नाईक यांच्या हस्ते महारुद्र करण्यात आला.
यावेळी जिल्हाप्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक सुशांत नाईक, पत्नी मयुरी नाईक,युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, नगरसेवक कन्हैया पारकर, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवा सेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर ,शहर समन्वयक तेजस राणे, शहर प्रमुख प्रमोद मसुरकर, वागदे माजी सरपंच रुपेश आमडोसकर, राजू राठोड,युवा शहर प्रमुख आदित्य सापळे,उपशहर प्रमुख सोहम वाळके संतोष राणे, बबन राणे, सदा राणे, अंबाजी राणे, मंगेश राणे, महेश राणे, परेश बागवे, जितेंद्र राणे, प्रतीक रासम, योगेश मुंज, श्रवण राणे, सूर्याजी राणे, राजू गुरव, उदय सर्पे, शशिकांत तावडे आदी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × one =