You are currently viewing प्रा.डॉ सुशिल सातपुते बंधुता प्रकाशयात्री साहित्य पुरस्कार ने सन्मानीत

प्रा.डॉ सुशिल सातपुते बंधुता प्रकाशयात्री साहित्य पुरस्कार ने सन्मानीत

*प्रा.डॉ सुशिल सातपुते बंधुता प्रकाशयात्री साहित्य पुरस्कार ने सन्मानीत*

पुणे येथे पाचव्या बंधुता काव्य महोत्सवात पुरस्कार प्रदान

पुणे(वाघोली)-

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे, बंधुता प्रतिष्ठान, काषाय प्रकाशन पुणे, रयत शिक्षण संस्थेचे डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय,औंध, भगवान महावीर शिक्षण संस्थेचे प्रीतम प्रकाश महाविद्यालय भोसरी आणि भारतीय जैन संघटनेचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय वाघोली पुणे या संस्थाच्या संयुक्त विद्यमाने बंधुताचार्य मा. प्रकाश रोकडे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच बंधुता दिन निमित्त पाचवा बंधुता काव्य महोत्सव पुणे येथे दि. 02 जुन रोजी एस.एम.जोशी सभागृहात पार पडला.

या काव्या महोत्सव अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका मा. संगीता झिंजुरके होत्या तसेच उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकांतदादा वानखेडे यांनी केले. स्वागताध्यक्ष म्हणून ज्येष्ठ शिक्षण तज्ञ मा. हरीशचंद्र गडसिंग होते. तसेच मा.प्रशांत रोकडे ( अध्यक्ष, बंधुता प्रतिष्ठान), ज्येष्ठ व्यवसायतज्ञ मा.सुरेशबापु साळुंके, ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ अरुण आंधळे, प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा.प्रदिप कदम यांची उपस्थिती होती.

दुपारच्या सत्रामध्ये बंधुता प्रबोधनयात्री काव्य संमेलन पार पडले . मान्यवरांच्या हस्ते लातुरचे सुपुत्र कवि, लेखक प्राध्यापक डॉ सुशिल सातपुते यांना बंधुता प्रकाशयात्री साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच निमंत्रतांचे कवि समेंलन ही पार पडले. डॉ सुशिल सातपुते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ” हा पुरस्कार आंनदाचा, अभिमान वाढवणारा, स्वाभिमान जागवणारा असुन हा कोणत्या धर्माचा, जातीचा नाही तर समतेचा,बंधुतेचा विचार पेरणा-या मातीचा आहे.” तसेच त्यांनी “बुजगावणं ” ही स्वरचित कविता सादर केली. रसिकांनी कवितेला भरभरून दाद दिली.

या कवि समेंलनसाठी प्रमुख उपस्थिती उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक मा.चंद्रकांतदादा वानखेडे,
ज्येष्ठ साहित्यिका मा. संगीता झिंजुरके, स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ संजय गायकवाड, मा.माधुरी ओव्हाळ , मा. गुलाबराजा फुलमाळी(कवि तसेच संपादक, महाराष्ट्र साहित्य दर्पण), सुप्रसिद्ध गझलकार मा.नितीन वायाळ, (शिवानुज) , गुजरात यांची होती.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत मा.शंकर आथरे यांनी केले.
डॉ. सुशिल सातपुते सध्या छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्था अंर्तगत कृषि महाविद्यालय कांचनवाडी येथे सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत.

या कार्यक्रमाचे निमंत्रक मा. प्रशांत रोकडे ( अध्यक्ष, बंधुता प्रतिष्ठान), मा.शंकर आथरे (ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत) होते. तसेच मुख्य संयोजक डॉ बंडोपंत कांबळे, डॉ प्रभजन चव्हाण, डॉ. सहदेव चव्हाण ,
आणि प्रा. सदाशिव कांबळे होते.
पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे डॉ सुशिल सातपुते यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

*संवाद मिडिया*

*🧑🏻‍🎓प्रवेश..सुरू ! प्रवेश..सुरू ..!! प्रवेश..सुरू ..!!!🧑🏻‍🎓*

📣 *B. C. A. DEGREE*

*BCA Degree ला ॲडमिशन म्हणजे संगणक क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी.*🧑‍💻🧑‍💻

*👉 प्रवेश पात्रता…*
*▪️प्रथम वर्ष बीसीएकरिता: कोणत्याही शाखेची बारावी परीक्षा (गणित किंवा गणिताशिवाय) किमान ४५ टक्के व मागासवर्गीयांसाठी ४० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण*
*▪️थेट द्वितीय वर्ष बीसीएकरिता: डिप्लोमा पदवीका प्रथम श्रेणीत उत्तीर्ण (सिव्हिल इंजिनियर व्यतिरिक्त)*
*▪️मर्यादित प्रवेश उपलब्ध*

*संपर्क:*
*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वुमन्स*
*(एसएनडीटी महिला विद्यालय, मुंबई संलग्न)*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*

*📱 ७९७२९९७५६७, ९४२०२७४११९*

*Advt Link*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + seventeen =