कोरोना ची लक्षणे असणा-या आणि स्वॅब देणाऱ्या व्यक्तिनी रिपोर्ट येईपर्यंत विलगिकरणात रहावे…

कोरोना ची लक्षणे असणा-या आणि स्वॅब देणाऱ्या व्यक्तिनी रिपोर्ट येईपर्यंत विलगिकरणात रहावे…

आरोग्य विभागाचे लक्ष वेधणार – रुपेश राऊळ

सावंतवाडी
तालुक्यात कोरोना ची लक्षणे असणा-या आणि स्वॅब देणाऱ्या व्यक्तिनी स्वतःची, कुटूंबाची व इतरांची काळजी घेत रिपोर्ट येईपर्यत स्वतःला विलगीकरणात ठेवावे असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केले आहे. याबाबत आपण आरोग्य विभागाचे लक्ष वेधणार असेही त्यांनी सांगितले.

श्री. राऊळ यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले आहे त्यात असे म्हटले की, सावंतवाडी तालुक्यामध्ये कोरोना चे रुग्ण वाढत आहेत आरोग्य यंत्रणा जीवाची पराकाष्ठा करून हा पादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न करत आहे मात्र असे असले तरी लोकांमध्ये असलेली निष्काळजीपणा कोरोना प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत. आज गावा गावामध्ये कोरोना ची लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींना आरोग्य विभागाकडून स्वॅब टेस्टसाठी हलविण्यात येते, मात्र स्वॅब दिल्यानंतर सदर व्यक्तींना विलगीकरणात राहण्याची सूचना करूनही सदरचे व्यक्ती सर्वत्र फिरताना दिसून येत आहेत. अशामुळे संबंधित व्यक्तीकडून अनेकांना प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता निर्माण होते.
गतवर्षी कोरोना बाबत गांभीर्याने घेत गावच्या सरपंचाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या सनियंत्रण समितीने योग्य प्रकारे काम करताना गावात कोरोना चा शिरकाव होऊ नये याची काळजी घेतली होती. त्यामुळे गतवर्षी वेळीच कोरोनाला दूर ठेवण्यामध्ये यश आले होते. मात्र यावर्षी त्याच धर्तीवर सनियंत्रण समितीने काम करणे गरजेचे आहे. सरपंच यांनी गावचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी पुन्हा एकदा पुढे येणे गरजेचे आहे. गावात लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना आरोग्य तपासणी करून घेण्याबरोबरच त्यांनी इतर व्यक्तींपासून वेगळे राहावे. याबाबत जागृती करणे गरजेचे आहे. शिवाय प्रत्येक व्यक्तीने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेताना वेळीच पुढे यावे, हलगर्जीपणा न करता स्वॅब टेस्ट दिल्यानंतर स्वतःला विलगीकरण करून घ्यावे.
दरम्यान या संदर्भात श्री राऊळ यांनी आमदार पालकमंत्री उदय सामंत खासदार विनायक राऊत तसेच स्थानिक आमदार दीपक केसरकर यांचेही याकडे लक्ष वेधले असून संबंधित आरोग्य विभागाला यासंदर्भात उपाययोजना राबवण्याचे सूचना करा असे सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा