You are currently viewing सावंतवाडी शहर भाजपात सुंदोपसुंदी..?

सावंतवाडी शहर भाजपात सुंदोपसुंदी..?

सावंतवाडी नगरपरिषदेच्या भविष्यात होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातात. कोणी कोणावर बोलावे हा तर सावंतवाडी वासियांच्या मनोरंजनाचा विषय ठरला आहे. गेली दोन वर्षे सावंतवाडी शहराची सत्ता भाजपाच्या हाती असतानाही सावंतवाडी शहराचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. यापूर्वी दीपक केसरकर यांच्या आधिपत्याखाली असलेल्या नगर परिषदेत बऱ्याच अंशी शहराचा विकास झाला होता. परंतु गेली दोन वर्षे रखडलेला विकास पाहता लोकांचा लक्ष हेतूुरस्सर दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. भविष्यात होणाऱ्या सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा व शिवसेना राष्ट्रवादी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. भाजपाचे माजी सावंतवाडी शहर नगराध्यक्ष संजू परब हे पत्रकार परिषद घेऊन आपण काय केले? कोणता विकास केला? हे सांगण्या ऐवजी माजी नगराध्यक्ष प्रेमानंद उर्फ बबन साळगावकर व आमदार दीपक केसरकर यांच्यात असलेल्या मतभेदाचे राजकारण करून शहरवासीयांची दिशाभूल करत आहेत. शहराला २४ तास पाणीपुरवठा करणार अशी ग्वाही संजू परब यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दिली होती, परंतु शहराचा पाणी प्रश्न त्यानंतर जटिल झाला आहे. असे असताना दोन वर्षे सत्ता उपभोगून पाणी प्रश्न न सोडवलेले संजू परब आता केसरकर आणि साळगावकर वादाचे कारण पुढे करणे म्हणजे हास्यास्पद आहे. शहराची विकासात्मक झालेली पीछेहाट पाहता आपण पुन्हा येणार म्हणणे हे कशाच्या जोरावर? असा प्रश्न शहरातील सुसंस्कृत नागरिक विचारत आहेत.
माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या पत्रकार परिषदेला शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे व बंटी पुरोहित यांच्यासह 1 / 2 नगरसेवक उपस्थित असतात परंतु भाजपा हा प्रोटोकॉल पाळणारा पक्ष आहे. प्रोटोकॉल नुसार भाजप मंडल अध्यक्ष हे शहराचे प्रमुख मानले जातात व भाजप मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या पत्रकार परिषदेला शहर पदाधिकारी किंवा नगरसेवक उपस्थित नसतात. आनंद नेवगी या एकमेव नगरसेवकांचा अपवाद वगळता इतर नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहण्याचे का टाळतात? याचे गौडबंगाल शहरवासियांना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनाही समजत नाही.
भाजपाचे जुनेजाणते कार्यकर्ते सावंतवाडी शहरात असतानाही त्यांच्यापैकी कोणीही भाजपाच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहत नाही. त्यामुळे विद्यमान भाजपाचे नगरसेवक आणि शहर पदाधिकारी यांच्यात सुंदोपसुंदी आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. माजी नगराध्यक्ष संजू परब पत्रकार परिषद घेत असताना प्रोटॉकल पाळतात परंतु भाजप शहर मंडल अध्यक्ष पत्रकार परिषद घेत असताना तोच प्रोटोकॉल कसा काय पाळला जात नाही? असाही प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करतात. त्यामुळे भाजप शहर मंडल अध्यक्ष म्हणजे संशोधनाचा विषय ठरला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 5 =