You are currently viewing वॉटरस्पोर्ट व्यावसायिकांच्या बाजूने “मनसे”

वॉटरस्पोर्ट व्यावसायिकांच्या बाजूने “मनसे”

मत्स्य व बंदर विभागाचे शॅडो कॅबिनेट मंत्री माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली वॉटरस्पोर्ट व्यवसाय पुन्हा सुरू करणेसाठी मनसे प्रयत्न करणार – अमित इब्रामपूरकर

मालवण
मालवण मधील समुद्रकिनाऱ्यावर चालणारा पर्यटकांचा खास आकर्षण असलेला वॉटरस्पोर्ट व्यवसाय काल बंदर विभागाने बंद केला.बंदर विभागाच्या या आडमुठी धोरणाला आमदार वैभव नाईक जबाबदार असुन त्यांनी वॉटरस्पोर्ट व्यवसायिकांची रोजीरोटी हिरावून घेतली असल्याची टीका मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे.

प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की,वॉटरस्पोर्ट व्यावसायिकांनी हा व्यवसाय सुरू करा या मागणीसाठी काही दिवसापुर्वी आंदोलन केले होते.या आंदोलनावेळी आमदार वैभव नाईक हे या व्यावसायिकांना तेथे उपस्थित राहुन खोटी आश्वासने देत फसवत असल्याचे या अगोदरच मी म्हटले होते.बंदर विभागाच्या कारवाई मुळे या व्यावसायिकांना आमदार फसवत असल्याचे आता सिद्ध झाले आहे. आश्वासने देत फसवणे आणि स्वतचा सत्कार करून घेणे हा आमदारांचा एककलमी कार्यक्रम सुरू असल्याचा टोला लगावला आहे.

जिल्ह्यातील विकासकामांना शासनाने बंदी आणली होती.मालवण-कुडाळ रस्त्यासह अनेक रस्त्यांची कामे निविदा प्रक्रियेत आहेत.अजून काही महिने जनतेला खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करावा लागणार आहे.ही बंदी उठवण्यासाठी लागणारे शासनाचे परिपत्रक काढण्यासाठी सत्तेतील आमदार, खासदार,पालकमंत्री कोणतेही प्रयत्न करत नाहीत.त्याच पद्धतीने वॉटरस्पोर्ट व्यवसाय सुरू ठेवणेसाठी बंदर विभागाने परिपत्रक काढणे आवश्यक आहे.परंतु अश्या प्रकारचे कोणतेही प्रयत्न सत्ताधार्‍यांकडून होताना दिसत नाहीत.म्हणूनच सत्तेतील आमदार, खासदार,पालकमंत्री हे निष्क्रिय,अपयशी आहेत.

शासनाच्या बंदर खात्याकडून वॉटरस्पोर्ट व्यवसायाला अद्याप परवानगीचे आदेश मिळाले नसल्याने बॅकांकडून कर्जे काढून वॉटरस्पोर्ट करणाऱ्या सर्वच लहानमोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.एकीकडे शासनाच्या नियमांचे बंधन,परवानगीचे आदेश जरी मिळाले तरी दुसरीकडे कधी समुद्राच्या पाण्याचा बदलता प्रवाह,तर कधी एखाद्या मोठ्या वादळाचे सावट अश्या परिस्थीतीमुळे वॉटरस्पोर्ट व्यावसायिक आज हतबल झाला आहे.

*मनसे वॉटरस्पोर्ट व्यावसायिकांच्या बाजूने*

त्यामुळे एकीकडे लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर सर्वच व्यवसाय व जीवनावश्यक गोष्टींना शासन परवानगी देत असतानाच दुसरीकडे वॉटरस्पोर्ट व्यावसायिकांना व्यवसाय बंद करण्यासाठी बंदर अधिकारी नोटिसा पाठवत आहेत.या सर्व गोष्टींमुळे व शासनाच्या धोरणामुळे आज वॉटरस्पोर्ट व्यावसायिक व पर्यटन व्यावसायिक उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.उपासमारीची वेळ असतानाच बँकाचे कर्ज कसे फेडायचे,कामगारांचे जेवण व पगार,इतर मेटेंनन्स खर्च असे प्रश्न सध्या या व्यवसायिकांसमोर उभे राहिले आहेत.म्हणुनच अश्या स्थानिक व्यावसायिकांच्या पाठीशी मनसे ठामपणे राहणार असून मत्स्य व बंदर विभागाचे शॅडो कॅबिनेट मंत्री माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली वॉटरस्पोर्ट व्यवसाय पुन्हा सुरू करणेसाठी मनसे प्रयत्न करणार असल्याचे अमित इब्रामपूरकर यांनी संगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 3 =