You are currently viewing डिगस माध्यमिक विद्यालय दहावीचा 100% निकाल

डिगस माध्यमिक विद्यालय दहावीचा 100% निकाल

कुडाळ :

 

कुडाळ तालुक्यातील डिगस माध्यमिक विद्यालय, डिगसचा एस.एस.सी. मार्च 2022 चा निकाल 100% लागला आहे.

यात प्रथम क्रमांक कु. सानिया अमित मेस्त्री 93.60%, द्वितीय क्रमांक कु. प्रियांका पुंडलिक पवार 87.80%, तर तृतीय क्रमांक कु. कौशल्य संतोष चेऊलकर 86.40% यांनी पटकावले आहेत.

एकूण 20 विद्यार्थ्यांपैकी विशेष श्रेणी 12 विद्यार्थी तर प्रथम श्रेणी 08 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष मा.अमरसेन पु. सावंत, सचिव मा.भुपतसेन पु.सावंत, उपाध्यक्ष मा.विठठल पवार, मुख्याध्यापक दिपक आळवे व सर्व संस्थासंचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा