जिल्ह्याच्या प्रारुप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याबाबत 29 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष जनसुनावणी…..

सिंधुदुर्गनगरी  :

जिल्ह्याचे सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापना आराखड्याविषयी जनतेच्या सूचना व हरकतींसाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय येथे ऑनलाईन पद्धतीने जनसुनावणी सुरू करण्यात आली होती. आजच्या या सुनावणी दरम्यान काही तांत्रिक कारणांमुळे काही नागरिकांना त्यांचे म्हणणे मांडता आले नाही. नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार संबंधितांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी मिळावी यासाठी प्रत्यक्ष जनसुनावणी घेण्यात येणार आहे. सदर जनसुनावणी पुढील प्रमाणे होणार आहेत.
वेंगुर्ला पंचायत समिती सभागृह येथे मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 10 ते 11 यावेळेत वेंगुर्ला तालुक्याची जनसुनावणी होईल, तर सकाळी 11 ते 12 या वेळेत सावंतवाडी आणि 12 ते 1 या वेळेत कुडाळ तालुक्याची जनसुनावणी होणार आहे. दुपारच्या सत्रामध्ये पंचायत समिती सभागृह, मालवण येथे दुपारी 2 ते 3 यावेळेत कणकवली तालुका, दुपारी 3 ते 4 या वेळेत देवगड तालुका आणि दुपारी 4 ते 5 या वेळेत मालवण तालुक्याची जनसुनावणी होणार आहे. सदर ठिकाणी व वेळी संबंधितांना सिंधउदुर्ग जिल्ह्याच्या प्रारुप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यावरील प्रत्यक्ष जनसुनावणीमध्ये सहभागी होता येणार आहे.
या प्रत्यक्ष जनसुनावणी वेळी प्रकल्प अधिकारी, एमसीझेडएमए, पर्यावरण विभाग मुंबई, सहसंचालक, जल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक अधिकारी म.प्र.नि.मं. कोल्हापूर, उप प्रादेशिक अधिकारी, म.प्र.नि.मं., रत्नागिरी हे उपस्थित असणार आहेत. सदर सुनावणीसाठी केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या क्र. F. No. 22/25/2020-IA-III, दि. 14 सप्टेंबर 2020 मध्ये नमुद सर्व नियमांचे पालन करण्यात यावे असे निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे या कळवितात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × two =