You are currently viewing विठ्ठल विठ्ठल । पांडुरंग हरी ।

विठ्ठल विठ्ठल । पांडुरंग हरी ।

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच, गझल मंथन, गझल प्राविण्य समूह सदस्या लेखिका कवयित्री सौ.शोभा वागळे यांची अप्रतिम अभंग रचना*

विठ्ठल विठ्ठल । पांडुरंग हरी ।
रूप मनोहरी । विठोबाचे ।।१।।

ध्यान लागे जीवा । असे निरंतर।
नको ते अंतर । पांडुरंगा ।।२।।

माझा विठू राया । सुखाचे आगर ।
विशाल सागर । भक्त जना ।।३।।

बाप रखुमाई । हात कटेवरी ।
उभी विटेवरी । भक्तांसाठी ।।४।।

गळा शोभे हार । तुळशीची माळ ।
भक्तां हाती टाळ । भजनास ।।६।।

सूर ताल लावी । गोड गीत गाई ।
भक्त जनाबाई । नामयाची ।।७ ।।

हरी तो सोबती । दीन दलितांचा ।
आधार भक्तांचा । पांडुरंग ।।८ ।।

वाळवंटी मेळा । विठूचा गजर
ध्यानात हजर । साधू संत ।।९ ।।

दंग मी ध्यानात । विठू भजनात ।
मन आनंदात । विठ्ठलाच्या ।।१० ।।

शोभा वागळे
मुंबई.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − 8 =