*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
फुलपांखरू…
फुलपाखरू उडाले
मन माझे भिरभिर फिरते
फुलपाखरा सवे मी
गगनात फिरूनी येते…
मी झाडाझाडावरती
मी गात सुखाने बसते
बुलबुल तो येता जवळी
मी गुलगुल गाली हसते…
आभाळी उडता उडता
मी इंद्रधनूला बघते
अन् रंग तयाचे काही
मम पंखांवरती घेते..
सुंदर किती मी दिसते
मी गिरक्या घेतच जाते
वाऱ्यावर होऊन स्वार
मी निळी निळाई होते…
मी स्वैर अशी फिरतांना
आठवण आईची येते
पदरात शिरूनी मग मी
मी फारच शूर ती होते…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)