You are currently viewing ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी यांचे निधन..

ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी यांचे निधन..

मुंबई :

 

ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी यांचं आज दु:खद निधन झालं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी आणि सच्चे शिवसैनिक अशी सुधीर जोशी यांची ओळख होती.

सुधीर जोशी यांना जानेवारीमध्येच कोरोनाची बाधा झाल्यामुळे मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले होते. परंतु आज त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 81 व्या वर्षी राहत्या घरी त्यांचं निधन झालं. सुधीर जोशी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. शिवसेना पक्ष संघटनेत त्यांची महत्वाची भूमिका राहिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा