You are currently viewing कौशल्ययुक्त शिक्षण ही आजच्या काळाची गरज

कौशल्ययुक्त शिक्षण ही आजच्या काळाची गरज

कुडाळ :

कौशल्य युक्त शिक्षण विद्यार्थ्यांना यशोशिखरावर नेते. कौशल्य युक्त शिक्षण ही आजच्या काळाची गरज आहे. आनंदमय, समृद्ध जीवन जगण्यासाठी कौशल्ययुक्त शिक्षण गरजेचे आहे. आनंदाचे दुकान नसतं; तर तो प्रत्येक क्षणाक्षणातून मिळत असतो. ज्ञानाने ज्ञान मिळवले पाहिजे. त्यासाठी कष्ट करावे लागतात. त्याग केल्याशिवाय काही मिळत नाही.” असे उद्गार बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी काढले. ते बॅरिस्टर नाथ पै ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थी -पालक कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना बोलत होते. त्यानी आपल्या पुढील मनोगतामध्ये “जीवनातील महत्वाचे निर्णय भान ठेवून घ्या आणि एकदा निर्णय घेतले की बेभान होऊन ते राबवायचे असतात. यशस्वी होण्यासाठी सर्व ताकदीनिशी उभे राहिलात तरच तुम्ही आजच्या काळात यशस्वी होऊ शकता. मला उद्या काय व्हायचं आहे याचं आज सुनियोजन करा; म्हणजे ते प्रत्यक्षात आणायला वेळ लागत नाही.” असे ते म्हणाले व बॅरिस्टर नाथ पै ज्युनिअर कॉलेजमध्ये नव्याने शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी अनेक शैक्षणिक गोष्टीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करत “तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार “याची सतत जाणीव ठेवून वागावे, असा संदेश दिला. यावेळी व्यासपीठावर नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ मीना जोशी, उपप्राचार्य सौ कल्पना भंडारी, बॅरिस्टर नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरज शुक्ला, महिला आणि रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य परेश धावडे, पियुषा प्रभूतेंडोलकर, पालकांपैकी संतोष तोटकेकर इत्यादी उपस्थित होते.

मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर श्री अरुण मर्गज यांनी “जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर सततचा अभ्यास, सहनशीलता, चारित्र्यसंपन्न याचा ध्यास घेणे गरजेचे आहे. आपली वाचनातून बौद्धिक क्षमता वाढविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले”. प्राध्यापक परेश धावडे यांनी “कठोर श्रम वेळेचे सुनियोजन व अभ्यासूपणा तुम्हाला यशस्वी ते कडे नेऊ शकते.” असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर एच.आर.ओ. पियुशा प्रभू तेंडुलकर यांनी “तुमच्यातील माणूस हरवू देऊ नका .जास्तीत जास्त मार्गदर्शन मिळविण्याच्या संधी दवडू नका”, असे सांगत विद्यार्थ्यांचे स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

डॉक्टर सुरज शुकला यानी “फिजिओथेरपी सारखे बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेने सुरू केलेले कोर्स त्यातुन पदवी संपादन करा व एक उत्तम डॉक्टर बना” असा सल्ला दिला. तर मीना जोशी यांनी “जे आवडते, ज्यात रूची आहे ते शिक्षण घ्या. त्यातून आयुष्यात चांगले घडविता येते आणि झपाटून अभ्यास करा”, असं सांगत शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या वतीने सुयश प्रभुखानोलकर यांनीही आपण तुमच्या कौतुकास पात्र होण्याचा नक्कीच प्रयत्न करू असे आश्वासन दिले. ‌मुख्याध्यापक अर्जुन सातोस्कर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये विद्यार्थ्यांना टॉप वन बनण्यासाठी आमचं कॉलेज नक्कीच प्रयत्न करेल करेल, असे सांगत सर्वतोपरी मदत केली जाईल याची खात्री दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक शिक्षिका चैतन्य गावडे व उपस्थितांचे आभार पूजा आचरेकर सहायक शिक्षिका यांनी मांडले. चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या हस्ते जुनिअर कॉलेजला शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी आपल्या पालकांसमवेत उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + 5 =