You are currently viewing एमआयटी एडीटी’ विद्यापीठात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धा साॅफ्टवेअर गटात ‘अविण्या’ तर हार्डवेअरमध्ये ‘वे टू गो’ला प्रथम क्रमांक

एमआयटी एडीटी’ विद्यापीठात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धा साॅफ्टवेअर गटात ‘अविण्या’ तर हार्डवेअरमध्ये ‘वे टू गो’ला प्रथम क्रमांक

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धा
साॅफ्टवेअर गटात ‘अविण्या’ तर हार्डवेअरमध्ये ‘वे टू गो’ला प्रथम क्रमांक

पुणे

एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठात विद्यार्थ्यांमध्ये नवीन तांत्रिक प्रगतीला चालना देण्यासाठी स्मार्ट इंडिया हॅकेथाॅन स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेल, ऑल इंडिया कौन्सिल फाॅर टेक्निकल एज्युकेशन यांच्या विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. अन्न तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, डिझाइन, जैवतंत्रज्ञान आणि व्यवसाय यासह विविध पार्श्वभूमीतील तब्बल १३३ गटांच्या माध्यमातून ८०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. ज्यामध्ये साॅफ्टवेअर व हार्डवेअर या दोन प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले नाविण्यपूर्ण संशोधन सादर केले. हार्डवेअर गटात ‘वे टू गो’ तर साॅफ्टवेअर गटात ‘अविण्या’ या प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकाविला. ही स्पर्धेची प्राथमिक फेरी असल्याने सुमारे ३० प्रकल्पांची पुढील फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.
स्पर्धेचे उद्घाटन व समारोप समारंभ राज कपूर सभागृहात पार पडले ज्यासाठी, विद्यापीठाचे कुलगुरु तथा कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, डाॅ.सुनिता कराड, स्कुल ऑफ बायोईंजिनिअरींग व रिसर्चच्या प्रमुख प्रा.डाॅ.रेणू व्यास, डाॅ.मोहित दुबे, डाॅ.विरेंद्र भोजवानी, डाॅ,सुराज भोयार आदी उपस्थित होते. स्पर्धेचे नियोजन स्कुल ऑफ काॅम्पुटिंगच्या प्रमुख प्रा.डाॅ. रेखा सुगंधी व प्रा.सुरेश कापरे यांच्या मार्फत करण्यात आले होते.
समारोप समारंभात बोलताना, प्रा.डाॅ.कराड म्हणाले की, विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे महत्व मोठे आहे. विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या ज्ञानाचे रुपांतर मानव जातीच्या कल्याणासाठी प्रात्यक्षिक द्वारे करण्यासाठी हॅकेथाॅन सारख्या स्पर्धा उत्तम व्यासपीठ मिळवून देतात.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी, प्रा.अश्विनकुमार महिंद्रकर, डाॅ.संतोष दराडे यांच्यासह राकेश सिद्धेश्वर, संदीप मादीवाल यांनी विशेष परिश्रम घेतले.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + fourteen =