You are currently viewing शेतकऱ्यांच्या शासकीय भात खरेदीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवा – विनायक राऊत

शेतकऱ्यांच्या शासकीय भात खरेदीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवा – विनायक राऊत

जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांना पत्राद्वारे सूचना…

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होणारी शासकीय भात खरेदीची मुदत ३१ मार्च पर्यंत वाढविण्या संदर्भात तात्काळ कार्यवाही करा, अशा सूचना खासदार विनायक राऊत यांनी जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांना दिल्या आहेत. दरम्यान मुळ मुदत आज संपत आहे. मात्र बदलत्या निकशांमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे भात अद्याप खरेदी झालेले नाही. त्यामुळे ही मुदत एक महिन्यासाठी वाढवून देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. याच पार्श्वभूमीवर श्री. राऊत यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र दिले आहे.

त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, शेतकऱ्यांकडून शासकीय भात खरेदीची मुदत १४ फेब्रुवारीला संपत आहे. मात्र बदलत्या निकषांमुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे भात अद्याप खरेदी झालेले नाही. त्यामुळे एक महिन्याची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. दरम्यान शेतकऱ्यांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन एक मार्च पर्यंत भात खरेदीची मुदत वाढविण्यात यावी, त्या संदर्भात आवश्यक त्या सूचना संबंधित यंत्रणांना द्याव्यात, असे श्री. राऊत यांनी जिल्हाधिकार्‍यांना म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × four =