You are currently viewing मराठी गझल

मराठी गझल

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री श्रीम.अर्चना मुरुगकर यांची गझल रचना*

 

*मराठी गझल*

 

राष्ट्र आज सांभाळू आपण

द्वेष असूया जाळू आपण

 

कटू भाषणे नकोच आता

ऐक्याला कवटाळू आपण

 

ठिणगी पडते समाज जळतो

कळलाव्यांना गाळू आपण

 

भले वेचुया सुजाण बनुणी

सत्य जरा पडताळू आपण

 

घेऊ वचने देशासाठी

कर्तव्याला पाळू आपण

 

सौ. अर्चना रमेश मुरूगकर

मो.नं.-9762863231

तळेगाव दाभाडे, पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा