You are currently viewing समजुतदार ती

समजुतदार ती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*समजुतदार ती*

(लघू लेख)

 

आजही तिच्या मनात माहेर, आईबाबा, भावंडे, आजी आजोबा,. फेर धरूनच असतात.

समजायला लागताच तिला माहेरच्या अंगणातुन ऊपटून या सासरच्या अंगणात रोवलं.

माहेरची मायेची कूशी आणि ममतेची सावली सोडुन इथे बिचारी वाघांच्या कळपात एकटी शेळी बिचारी सोडुन दिलेली.

आपलंस कोणीच नाही. सगळेच परके.गाव घर दार गणगोत सारे अनोळखी. पण जगरहाटी !

तिला स्वत:चे घर संसार, मुलंबाळं, नाती गोती कूळ इ. हवं असल्यास माहेरचा ऊंबरठा ओलांडुन यावे लागते.

तीच्या मनाची वेदना कोणाला कळत नाही.समजुन कोणी घेत नाही. हुंड्याचा मोह, काही चुकलं तर, सतत अवहेलना, टिका, टोमणे, सोसत रहायचे

पुन्हा तोंड बंद.

ती नेहमीच सासरी रूजायचा प्रयत्न करते.

कधीतरी तीला बाळाची चाहुल लागते. घर आनंदात डोलते तिची काळजी घेते. हवं नको बघते. खाणे पिणे, झोपणे अवजड कामे. याबाबत काळजी घेते. पण स्वत:वर खुप बंधने येतात. इथे मातृत्व तिलाच हवंहवंसं आहे. पण होणारा त्रास, वेदना, बंधने ही स्त्रीमनाची वेदना परत ठूसठूसत रहाते. शेवट प्रसववेदनासारख्या यातनांतुन तिचा पुनर्जन्मच होतो पण ती ‘आई’ होते. वेदना परत एकदा विसरते.

आता ती घरच्यांपैकी एक होते. रक्ताचे नाते वेदनांती जुळले जाते.

घर , घरपण, नाती गोती, घराचं रक्षण, नावलौकिक वाढवणे, प्रतिष्ठा मिरवणे,हे सारे त्या घरचीच एक म्हणुन सहजपणे सांभाळत असते.

आता माहेरची माया मनात घट्ट असते पण अभिमान कौतुक आपलेपण,व जिव्हाळा सासरचा अधिक होऊ लागतो.

घराचा लळा लागतो. जोडीदार हा पती, जोडीदार, बंधूसखा, किंवा मित्र असा अगदी जवळचा वाटू लागतो.

सगळी नाती कशी रसभरित होतात.

सगळे वयानुसार मानाने वागवू लागतात.

एकदम ती शांत समजुतदार, प्रेमळ होते. प्रवाह संथ व स्थिरावतो. कोणाचं कितीही काहिही चुकलं तरी पदरात घेते.माया करते.कूठेही गेली तरी परत आपल्या घरट्यात परतते.

आपला जोडीदार, मुलं, घरदार याची काळजी करते. त्यांच्या सुखासाठी देवधर्म करते.

देवघरात शांत तेऊन देवघर ऊजळणारी सम ई आणि घरात प्रेमाच्या वातीबरोबर जळून घर प्रकाशित करणारी ‘कालची ती’. फरकच नाही काही.

माहेरहुन खळखळत आलेली ही सरिता सासरी येऊन स्थिरावते.

त्या अंगणात पक्षत परत धावणारी ही तुळस सासरी चांगलंच बाळसं धरते.

दुधात साखर एकजीव होते

 

स्त्रीमन असं अनेक ठिकाणी ठेचकाळत, धडपडत वेदनेतुनच स्थिरावत जातं. ते मायेच्या कूशीविना ममतेच्या सावली विना, आपुलकीच्या जळाविना कडे कपारीतही रूजते. तगते. जगते. मुळं ऊघड्यावर आली तरी वाढते. पाने हळुहळू बहरतात. मूळ जोम धरते. इतक्या संघर्षानंतर त्याला इवल्याशा कळ्या येतात. त्या फूलेपर्यंत सांभाळणे ही अतिशय जोखीमच असते. पण कळ्या फुलल्यावर ते रोप छान स्थिरावते. वादळा वार्याला जरा पण घाबरत नाही.

जोपर्यंत पुरूषप्रधान समाज आहे तोपर्यंत तिच्या वेदना समजणार नाहीत.

 

अनुराधा जोशी.

9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा