You are currently viewing स्मृतिगंध

स्मृतिगंध

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री डॉ वर्षा गंगणे यांची स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मृती जागृत करणारी काव्यरचना

तू बहर वसंताचा
तू कोकिळकंठी होती
भारतरत्न लता तू
देशाचा अभिमान होती

कोणी ना तुजसम
न होणे पुन्हा,साक्ष होती
अवघ्या भूमंडळी तू
स्वरांची जाणकार होती

तू कोहिनूर भारताचा
सन्मानांची खाण होती
पुरस्कारांना ,उपाध्यांना
शोभा तुझ्या स्वरांनी होती

कंठ तुझा जगावेगळा
सरस्वतीचे तू रूप होती
दिव्यत्वाची देत प्रचिती
तू सदा वंदनीय होती

वसंत वैभव मिरवीत
तू सदाबहरांची बाग होती
शब्दसामर्थ्य तुझे तू
फुल आणि अंगार होती

तूच आकाश तूच सागर
तूच वादळवारा तुफान होती
वादळानंतरही न थांबणारी
तू अभेद्य शांतता होती

तू मुग्धा तूच सोनचाफा
तू अमूर्त नादब्रम्ह होती
तुझ्या रुपात शारदेचे
स्वरूप सोज्वळ रीत होती

कर्णमधुर त्या स्वरांची
अजरामर तू कीर्ती होती
मी काय वर्णू महिमा तुझी
साऱ्यांवर तुझी प्रीती होती

एक आला झंझावात
करून गेला मैफल सुनी
थांबले रुणझुणते श्वास
मौन झाली विणावादिनी

दाटले कंठात श्वास
डोळ्यात आभाळ साचले
असे अचानक कसे वर्षा
अवचित सारे घडले

श्रद्धासुमनांनी वाहते
तुज भावपूर्ण श्रद्धांजली
अजरामर राहील भुवर
तुझ्या स्वरांची सावली💐🙏🏻

डॉ.वर्षा गंगणे
9422134807

प्रतिक्रिया व्यक्त करा