You are currently viewing धोक्याची घंटा

धोक्याची घंटा

*भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश आंदोलन पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख*

*धोक्याची घंटा*

 

अन्न वस्त्र आणि निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. आपल्या प्रत्येकाला वाटतें पोटभर जेवण दोन वेळचे मिळावं. अंगाला अंगभर कपडे असावेत. सवताचे आणि हक्काचे ते साध असलं तरी चालेल पण सवताचे एक घर आपला निवारा असावा एवढंच जीवन मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांचं असतं. आज वाढती बेरोजगारी. वाढती लोकसंख्या. यामुळे राहण्यास जागा कमी पडतं आहे. त्यामुळे आज व याअगोदर शहरांत झोपडपट्टी प्रमाण भयानक भस्मासुर सारखें रुप धारण केले आहे. अपुऱ्या जागेवर झालेली माणसाची दाटी आणि या जागेचा खालावलेला दर्जा. आरोग्य साठी अपायकारक. स्वच्छता अभाव त्या सोयी सवलतींचा अभाव आणि त्यामुळे येथे वास्तव्य असलेल्या रहिवाशी यांच्या किंवा एकंदर समाजाच्या आरोग्याला सुरक्षिततेला किंवा नितीमत्तेला पोहचणारा धोका इत्यादी युक्त असलेली इमारत. इमारतीचा समूह किंवा परिसर आज आपल्यापुढे आ वासून उभा होता ज्या परिस्थितील घरे राहण्यास निकृष्ट अपुरी आरोग्यास हानिकारक संरक्षण नैतिकता आणि तेथील निवासी लोकांच्या दृष्टीने हानिकारक असणे. अवैधरित्या गोंधळाने बळाकवलेलया अविकसित दुर्लक्षित दाट लोकवस्तीच्या असलेल्या मोडकळीस आलेल्या वस्तीला आपणं याअगोदर पाहत होतो.

घरे जुनाट असून मोडकळीस आलेली घरे होती. अपुरया जागेवर लोक कसेबसे राहत असतात शयनगृह. व स्नानगृह. यांची विशेषत महिलांसाठी स्वतंत्र सोय नव्हती वेगवेगळ्या आकारांची ओबडधोबड उंचीची घरे अव्यवस्थित पणे एका मेकांना लागून असतांत. घराजवळ मोकळी जागा नाही. घरांच्या रांगात रस्ता होता पण तोही कच्चा. ओबडधोबड आणि अरूंद असतो. हवा नाही उजेड नाही. स्वतंत्र संडास नाही. सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटार नाही. वीज पाणी यांचा पुरवठा असला तरी तो कमी प्रमाणात किंवा अजिबातच नव्हता. स्वच्छता आणि आरोग्य दृष्टीने असतो. स्थानिक नेते पुढारी आमदार खासदार मंत्री नगरसेवक ग्रामसेवक यांच या अशा वस्त्या कडे लक्ष नव्हते. भोवतालच्या परिसर गलिच्छ दुर्गंधी युक्त कचरा व पाण्याने भरलेली गटार रस्ते होतें. गलिच्छ वस्तीत मोडकळीस आलेल्या घरांचा जसा समावेश होत होता. तसेच बांबू. ताडपत्री. पत्रे. नारळाची झावळी. इत्यादी पासून तयार घरे आगोदर पाहावयास मिळत होती

2005 पासून आर्थिक दुर्बल आणि सदन लोकांचा सर्वे झाला. त्यानुसार गोरगरीब लोकांना गरजूंना सोडून स्थानिक राजकीय सामाजिक नगरसेवक ग्रामसेवक नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांचें बगलबच्चे यांचाच समावेश गृहभेट घेऊन सर्वे करण्याचा आदेश आसतान देखिल एका जागेवर बसून दारू मटनाचया पार्ट्या करून लाच घेऊन सरवेला आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना जी माहीती दिली त्यानुसार सर्वे करण्यात आला. आणि खरोखरच गरजूंना या अन्न धान्य. घरकुल योजनेतून वगळण्यात आले आणि सर्व आर्थिक सदन लोक या योजनेत धनावर बसलेले साप याप्रमाणे ठाण मांडून बसले आहेत

केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी झोपडपट्टी पुनर्वसन करण्याचे धोरण आखले त्यानुसार प्रत्येक गरजू व्यक्तिला सवताचे हक्काचे घर मिळावे यासाठी. पंतप्रधान घरकुल आवास योजना. रमाई आवास योजना. शबरी आवास योजना. वाल्मिकी आवास योजना. इंदिरा गांधी आवास योजना. अशा विविध योजना राबविण्यात आल्या आणि यासाठी लाभार्थी निवडले गेले ते 2005 चे सरवेनुसार घरकुल लाभार्थी निवडले गेले. आणि ठेकेदार कंत्राटदार इंजिनिअर हे नामांकित व्यक्तिच्या काखेतील निवडले आणि घरकुल साठी जागा मिळाली आणि बांधकाम चालू झाले. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी असणारा संबंधित विभागाचा अधिकारी व कर्मचारी हा सुध्दा भ्रष्ट बांधकाम चालू असताना त्यात वापरले जाणारे सळी सिमेंट विट वाळू याचा दर्जा काय होता बांधकामाला पाणी मिळाले कां ? कंत्राटदार इंजिनिअर ठेकेदार काय करणारं शिपाई. मंजूर करणारे अधिकारी व कर्मचारी. टेंडर प्रक्रिया. यासाठी पावलोपावली पैसा वाटावा लागतो आणि मग शिल्लक राहील त्यात उत्कृष्ट मटेरियल उत्कृष्ट बांधकाम कस होणार ?

बेघर वसाहत. या अंतर्गत घरे तयार झाली ही सर्व घरं पूर्ण तयार करून लाभार्थी लोकांच्या ताब्यात देण्याचा शासन आदेश आहे पण घरकुल योजनेचे श्रेय लाटण्यासाठी लाॅटरी काढून एकच बिल्डिंग तयार करून लाभार्थी लोकांना वाटण्यात आली. आणि बाकी असणारी सर्व घरें बिगर गिलावा. बिगर दरवाजे. बिगर फरशी बिगर संडास बाथरुम सोय न करता. लाईट नाही. पाणी नाही. परमाणसी पंधरा हजार भरून ताब्यात दिली. मग या सर्व घरांना पूर्ण करण्याचे अनुदान कुठे गेलं ? ही सर्व चूक आहे ती म्हणजे आपलीच आहे कारणं तुला मिळतंय का? मला मिळतंय अश्या वागण्यामुळे ठेकेदार कंत्राटदार इंजिनिअर यांचाच कोट्यवधी रुपयांचा फायदाच झाला म्हणजे आपण मूर्ख आहोत हे शंभर टक्के

बेघर वसाहत मधील अपूर्ण घर ज्या ज्या लाभार्थी नियमानुसार लोकांनी घरं ताब्यात घेतली त्यांनी त्या घरकुल बेघर वसाहत मधील घरामध्ये. गिलावा. फरशी. पी ओ पी. कलर. लाईट फिटिंग हे सर्व उंची मटेरियल महागडे मटेरियल वापरून घर तयार केली ती घर आज चांगल्या बंगल्याला लाजवित आहेत मग यांना दारिद्र्य रेषेखालील म्हणता येईल का ? आत्ता जर नगरपालिका प्रशासक यांनी याचा बेघर वसाहत बांधून तयार झाल्यापासून सर्वे केलाच नाही नाहीतर त्यांच्या ध्यानात आले असते की ज्यांना बेघर म्हणून लाभार्थी केलं ते कोणत्या बाजूने बेघर आहेत सर्वे करणारे. त्यांनी सर्वे करतांना लाभार्थी निवड करताना किती पैसे घेतलें आज ५०३ घर आहेत २५४ कुटुंब नियमानुसार आहेत मग आत्ता बेघर वसाहत मध्ये जागा नाही एकही घर शिल्लक नाही ते कसे ? विकणारे. भाड्याने देणारे. गरज नसणारे. जाऊन रहा तुला कोण काढतय मी बघतो अशी राहिलेली. यांचा सर्वे झाला आहे कां ?

‌‌. यांतच प्रामुख्याने इस्लामपूर शहरात रमाई आवास योजनेंतर्गत अतिशय सुलभ सुटसुटीत पध्दतीने बांधकाम करण्यात आलेली वसाहत आज बर्याच दिवसांपासून राजकीय तेढ निधीचा अभाव. राजकीय श्रेय यामुळे अर्धवट स्थिती पडून आहे. बांधकाम अपूरे आहे परवा यादी जाहीर झाली आत्ता सर्वच लोकांच्या मनांत भिती आहे की आहे तसंच देणार का ? पूर्ण करून देणार ?

‌. रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल अपुरे आहे त्यात अवैध धंद्याला उत आला आहे म्हणजे. जुन्या काळात एक म्हण होती. मोकळी विहीर. मोकळ घर. मोकळ डोकं. माणसाला कामच लावणार म्हणजे आज या घरकुल मध्ये अवैध धंदे जोरात चालू आहेत. तंबाखू. गांजा अफू चरस दारुच्या बाटल्यांचा जागोजागी ढिग. सिगरेट विडी. अनैतिक काम सुध्दा येथे चालत. हे सर्व गुन्हेगारी. दहशतवाद. गुंड. टोळी युद्ध. भविष्यात गुंड तयार होणार. कारणं आज काही तरुणांना काम नाही काम करण्याची इच्छा नाही. कमी वेळात जास्त पैसा मिळविण्याच्या दृष्टीने व आपली नशा पूर्ण करण्यासाठी हे उद्या खून सुद्धा करायला मागे पुढे पहाणार नाहीत आत्ता या परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ झाला आहे. गाड्यांतील पेट्रोल चोरी. भांडी चोर. चारचाकी गाड्यांच्या स्टेफनी. डीझेल. सायकल. दोन चाकी गाडया. यांच्या चोरिचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे घरकुल मध्ये राहणा-या लोकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे एवढेच काय अशी उंडगी मुल रात्री बारा एक वाजेपर्यंत फिरत असतात त्यामुळे संध्याकाळी कामावरुन येणार्या महिलांना अरावाचच बोलणें. हाक मारणे. खुणावने. अशा विविध त्रासाला सामोरे जावे लागत आहेत यासाठी या परिसरातील लोकानी चोरी व अवैध धंदे रोखण्यासाठी सदर विभागांत सी सी टिव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी मा पोलिस निरीक्षक इस्लामपूर पोलिस स्टेशनला ५/११/२०२१ रोजी १२३ लोकांच्या सह्या चे निवेदन दाखल केले आहे. ७/७/२०२१ रोजी मा लोकनियुक्त नगराध्यक्ष यांना १२३ लोकांच्या सह्या चे निवेदन सादर केले आहे. ७/७/२०२१ रोजी मा नगरपालिका मुख्य अधिकारी यांना सुध्दा १२३ लोकांच्या सह्या चे निवेदन सादर करण्यात आले होते. आजपर्यंत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणजे आपण मागणी केली आमची मागणी चूकीची असेल तरी सुद्धा सदर विभागाने पत्र व्यवहार करून संबंधित व्यक्तींना कळविणे आवश्यक होते मा नगरपालिका मुख्य अधिकारी यांनी संबंधित व्यक्तिच्या मागणीनुसार या अशा बिल्डिंगला कंपाऊंड करणे व त्या बंद पडलेल्या घरकुल योजनेच्या सुरक्षेसाठी वाॅचमन नेमणे गरजेचे आहे

बेघर वसाहत असो किंवा रमाई आवास घरकुल योजनेतील घरकुल असो गरिब निराधार अपंग. समाजातील वंचित घटक यांना हक्काचा निवारा देण्याचा शासनाचा उपक्रम कौतुकास्पद आहे पण आज या घरांत राहणारे लोक गरिब आणि गरजू आहेत दिवसभर मोलमजुरी करणे आणि आणि संध्याकाळी जर आपल्या घरांत निवांत आणि मनमोकळ. विना भिती. राहता झोपता येत नसेल कोणी काय चोरतय का ? संध्याकाळी व्यक्ती घरांत सुखरूप येईल का ? अशी भिती असेलतर हे हक्काचे घर काय कामाचे ?

संबंधित ज्या ज्या प्रशासनाकडे बेघर वसाहत घरकुल वसाहत यामधील लोकानी पत्र व्यवहार केला आहे त्यांनी या लोकांना न्याय देणे गरजेचे आहे. नको तिथे सी सी टिव्ही कॅमेरे बसविले जात आहेत मग या ठिकाणी एकादा सी सी टिव्ही कॅमेरा बसविला तर काही मोठा फरक पडेल अस मला नाही वाटत

समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा