You are currently viewing पाटकर कुटुंबियांकडून बांदा केंद्रशाळेसाठी गोष्टीची पुस्तके भेट

पाटकर कुटुंबियांकडून बांदा केंद्रशाळेसाठी गोष्टीची पुस्तके भेट

बांदा

शालेय वयातच विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी यासाठी जिल्हा परिषद बांदा नं. १केंद्रशाळेच्या बालवाचनालयासाठी बांदा येथील पाटकर कुटुंबीयांनी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी १०० गोष्टीची पुस्तके भेट दिली आहेत.
येथील डाॅ .रुपेश पाटकर यांची कन्या राई ही जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं १शाळेत शिकत आहे. तिने आपल्या शाळेला गोष्टीची पुस्तके देण्याचा विचार आपल्या पालकांडे मांडला त्यानुसार पुण्याहून राईच्या जेनिआत्याने ही गोष्टीची पुस्तके पाठवली आहेत.
ही पुस्तके राईची आई अनुराधा पाटकर यांनी शाळेत येऊन शिक्षक व विद्यार्थ्यांकडे सुपूर्द केली.
पाटकर कुटुंबियांच्या या उपक्रमाबद्दल शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + twenty =