You are currently viewing सांगेली येथील युवकाचे मुंबईत उपचारादरम्यान निधन…

सांगेली येथील युवकाचे मुंबईत उपचारादरम्यान निधन…

सांगेली येथील युवकाचे मुंबईत उपचारादरम्यान निधन…

सावंतवाडी

सांगेली येथील युवकाचे मुंबई येथे आकस्मित निधन झाले. ओंकार श्याम सांगेलकर (वय २३) असे त्याचे नाव आहे. तो हैदराबाद येथे कामानिमित्त होता. त्या ठिकाणी त्याला चक्कर येऊन पडल्यामुळे जखमी झाला होता. त्याच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी मुंबईत आणण्यात आले होते. यात त्याची प्रकृती बिघडली होती.

त्याला टाटा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथून जे जे व त्यानंतर भाटिया अशा रुग्णालयात उपचार करूनही उपचाराला योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने शुक्रवारी वाशी नवी मुंबईच्या शासकीय रुग्णालयात त्याला दाखल केले होते मात्र पहाटे त्याचे उपचारादरम्यान निधन झाले. त्याच्या पश्चात आई-वडील, काका, काका, काकी असा मोठा परिवार असून मुंबईत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्याच्या या आकस्मित मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा