You are currently viewing आमदार केसरकर यांच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयाला देण्यात आला ऑक्सिजन कॉन्सनट्रेंटर

आमदार केसरकर यांच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयाला देण्यात आला ऑक्सिजन कॉन्सनट्रेंटर

देव्या सूर्याजी ने केले विशेष प्रयत्न

सावंतवाडी
उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीत ऑक्सिजन बेडचा तुटवडा निर्माण झाल्यानं व्हेंटिलेटर बेडवर ऑक्सिजनचा पेशंट उपचार घेत होता. रूग्णालयात १० पैकी दोनच व्हेंटिलेटर (बायपॅप) सुरु असून आज एकच कार्यान्वित होता. दरम्यान, एका पेशंटला व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. मात्र, बेड उपलब्ध नसल्यानं व्हेंटीलेटर असून देखील मिळत नव्हता. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी व्हेंटीलेटर बेड उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. माजी पालकमंत्री व आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपजिल्हा रुग्णालयात देण्यात आला‌. आतापर्यंत ४ ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. त्यामुळे ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांची सोय झाली असून व्हेंटिलेटर बेड उपलब्ध झाला. एमडी फिजीशिअयन डॉ. अभिजित चितारी यांचाकडे हा ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर सुपुर्द करण्यात आला. यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे देव्या सुर्याजी, बाबा आल्मेडा, डॉ. मुरली चव्हाण आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + two =